आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Virat Anushka Break Up: He Says Anushka Controls Me

REPORT: पार्टीमध्ये विराट म्हणाला- गर्लफ्रेंड करत होती कंट्रोल, आता मी सिंगल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी येथील एका हॉटेलमध्ये  अनुष्का आणि विराट. (फाइल फोटो.) - Divya Marathi
सिडनी येथील एका हॉटेलमध्ये अनुष्का आणि विराट. (फाइल फोटो.)
मुंबई- विराट आणि अनुष्का शर्मा यांच्या ब्रेकअपची जोरदार चर्चा सुरू असतानाच एका मीडिया रिपोर्टने दावा केला आहे की, विराटने काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये एका पार्टीदरम्यान स्वतःच कबुली दिली होती की, तो सिंगल स्टेटसचा आनंद घेत आहे.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, कुणाची होती पार्टी आणि काय म्हणाला विराट...
- इंग्रजी वृत्तपत्र मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, अॅक्टर अंगद बेदीच्या बर्थडे पार्टीमध्ये विराटही सहभागी झाला होता.
- या पार्टीचे आयोजन शनिवारी मुंबईच्या एका फाइव्ह स्टार नाइट क्लबमध्ये करण्यात आले होते.
- अचानकपणे विराट डान्स फ्लोअरवर आला. या दरम्यान विराटला “मी सिंगल आहे, चला डान्स करू” असे म्हणताना एकले गेले होते.
- पार्टीत सहभागी असलेल्या एका व्यक्तीने सांगितल्यानुसार, विराट हे सांगण्याचा प्रयत्न करत होता की, अनुष्का त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते. यामुळे तो स्वतःला एकटा समजतो.
विराटने सांगितले, आखेर का झाले दोघे वेगळे
- रिपोर्टनुसार विराट म्हणाला की, त्याला भारत-श्रीलंका टी-20 मालिका खेळायची आहे. त्यामुळे तो व्हॅलेंटाइन वीकमध्ये अनुष्कासोबत राहू शकत नाही.
- सांगण्यात येत आहे की, अनुष्का नाराज होऊन कोहलीला न सांगताच फिल्म सुल्तानच्या शूटिंगसाठी निघून गेली होती.
सर्वप्रथम इंस्टाग्रामवरच मिळाला होता ब्रेकअपचा संकेत
- या आधी वृत्त प्रसारित झाले होते की, विराट आणि अनुष्काने एक-मेकांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केले.
- मीडिया रिपोर्ट्सच्या मते विराटचे फॅन अकाउंट चलावणाऱ्या एका चाहत्याच्या हे लक्षात आले.
- त्याने ट्वीट केले- Virat Anushka unfollowed each other on instagram (विराट आणि अनुष्का शर्माने एक-मेकांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केले आहे.)
- या नंतर शेकडो चाहते ट्वीट करून या दोघांना यामागचे कारण विचारत होते. मात्र अद्याप या दोहोंपैकी कुणीही चाहत्यांना उत्तर दिलेले नाही.
- असे असले तरी, अनुष्का अद्यापही विराटला ट्विटरवर फॉलो करत आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, विराट -अनुचे खास PHOTO'S