आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्णधार विराट काेहलीकडून हार्दिक, धाेनीवर स्तुतिसुमने; गुरुवारी दुसरा सामना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काेलकाता- युवा खेळाडू हार्दिक पांड्या अाणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धाेनीमुळे टीम इंडियाला अाॅस्ट्रेलियाविरुद्ध सलामीच्या वनडेत विजय संपादन करता अाला. यासह भारताने अापली विजयी लय कायम ठेवली. यामध्ये या दाेघांचे  महत्त्वपूर्ण याेगदान अाहे, अशा शब्दांत टीम इंडियाचा कर्णधार विराट काेहलीने सामनावीर हार्दिक अाणि धाेनीवर काैतुकाचा वर्षाव केला. त्याने सलामीच्या वनडेतील विजयाचे श्रेय या दाेघांना दिले. भारताने रविवारी मालिकेतील पहिल्या वनडेत पाहुण्या अाॅस्ट्रेलियावर मात केली. भारताने डकवर्थ लुईसनुसार २६ धावांनी सामना जिंकला. यामध्ये हार्दिकने अष्टपैलू कामगिरी करताना माेलाचे याेगदान दिले. त्याने झंझावाती अर्धशतकासह दाेन विकेटही घेतल्या. अाता मालिकेतील दुसरा वनडे सामना गुरुवारी एेतिहासिक ईडन गार्डन मैदानावर हाेणार अाहे. पावसाच्या व्यत्ययाने पाहुण्या अाॅस्ट्रेलियन टीमच्या विजयी सलामीसाठीच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले.   
 
हार्दिककडून माेठी अाशा 
सलामीला तुफानी फटकेबाजी करणाऱ्या हार्दिककडून अाता मालिकेतील अागामी सामन्यात उल्लेखनीय कामगिरीची टीमला अाशा अाहे. त्याचे पहिल्या वनडेतील विजयात माेठे याेगदान ठरले. अाता हीच लय कायम ठेवण्यासाठी ताे प्रयत्नशील राहील.   

कर्णधारामुळे अाक्रमकता : चहल   
अाक्रमक कर्णधार विराट काेहलीच्या नेतृत्वाखाली अापण अाक्रमकपणे खेळण्याची लय गवसली. सामन्यात सर्वाेत्कृष्ट खेळीतून संघाच्या विजयात याेगदान देता अाले. यासाठी काेहलीचे नेतृत्व फायदेशीर ठरले, अशी प्रतिक्रिया भारतीय संघाचा युवा गाेलंदाज यजुवेंद्र चहलने दिली. त्याने सलामीच्या वनडेत धारदार गाेलंदाजी करताना सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. त्यामुळे पाहुण्या अाॅस्ट्रेलियन टीमला धावांचे लक्ष्य गाठता अाले नाही अाणि भारताचा विजय निश्चित झाला. 
बातम्या आणखी आहेत...