आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंडनमध्ये असा सुरू आहे विराट-अनुष्काचा एंजॉय, व्हायरल झाले काही PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंदन: सध्या भारतीय संघाचा ताडाखेबाज फलंदाज विराट कोहली आणि त्याची प्रेयसी अनुष्का शर्मा लंडनमध्ये सुट्यांचा आनंद घेत आहेत. ते तेथे एका मॉलमध्ये मनसोक्त शॉपिंग करताना तसेच चाहत्यांसह फोटो काढतानाही दिसून आले. अनुष्काने तिच्या इंस्टाग्राम अकांउटवर सांगितले की, तिला आजकाल एल्डर फ्लॉवर जूस फारच आवडायला लागले आहे. तर, विराट कोहलीनेही त्याचे चिली सॉस बरोबरचे फोटोज शेअर केले आहेत.
या आधी विराट आणि अनुष्का दक्षिण अफ्रीकेत होते. तेथे त्यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलक आणि त्याची पत्नी डॉ. अंजली यांच्यासह विंबलडन टेनिस चॅम्पियनशिपचा आनंद घेतला. विंबलडच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलने सचिन, अंजली, विराट आणि अनुष्का यांचे फोटोज देखील शेअर केले होते.
विराट आणि अनुष्का हे दक्षिण अफ्रीका दौऱ्यावर असताना क्रुगर नॅशनल पार्क येथे उतरले होते. यावेळी विराटने सोशल मीडियावर एक फोटोही पोस्ट केला होता. ज्यात केवळ त्याचे पायच दिसत होते. त्याने त्या फोटोच्या कैप्शनमध्ये "चिलिंग इन द वाइल्ड, पीसफुल.' असेही लिहिले होते. या दोघांचे रिलेशन सर्वपरिचित असले तरी, आद्यापपर्यंत यांनी सार्वजनीक दृष्ट्या एकमेकांना स्विकारलेले नाही.
पुढील स्लाइड्सवर पाहा, विराट-अनुष्काचे दौऱ्यातील काही लेटेस्ट फोटोज.