चेन्नईमध्ये 29 जुलैपासून ऑस्ट्रेलिया-ए सोबत होणा-या चार दिवसीय कसोटी मॅचमध्ये
विराट कोहलीने खेळण्याचा निर्णय घेतला आहे. पण कर्णधार चेतेश्वर पुजारा याच्या नेतृत्वात त्याला खेळावे लागणार आहे. या संघाचा प्रशिक्षक राहूल द्रविड आहे.
श्रीलंकेसोबत होणा-या कसोटी सामन्यासाठी तयार होण्यासाठी कोहलीने हा निर्णय घेतला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव अनुराग ठाकूर यांनी नुकतिच याविषयी माहिती दिली आहे. बांग्लादेश दौ-याच्यावेळी विराट कोहलीने चेतेश्वर पुजारा याला संघाच्या बाहेर ठेवले होते.
कोहलीच्या विनंतीला मान्यता
अनुराग ठाकूर यांच्या मते, विराटने चेन्नईमध्ये खेळण्याची परवानगी मंडळाकडे मागितली होती. कारण तेथील वातावरण श्रीलंकेसारखे असल्याचे त्याचे मत होते. कोहलीची ही विनंती स्विकारण्यात आली असेही ठाकूर यांनी सांगितले. कोहलीला झिम्बाब्वेसोबतच्या 3 एकदिवसीय आणि 2 टी-20 मध्ये आराम देण्यात आला होता.
24 सामन्यांमध्ये 2561 धावा
विराट कोहलीने भारतीय संघासाठी 2012 पासून आतापर्यंत 34 सामन्यांमध्ये 2561 धावा मिळवल्या आहेत. त्याच्या नावावर 10 शतकांची नोंद आहे.
श्रीलंका दौ-यासाठी भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, रिद्धिमान साहा, हरभजन सिंह, रविचंद्रन अश्विन, अमित मिश्रा, उमेश यादव, इशांत शर्मा, वरुण एरॉन आणि भुवनेश्वर कुमार.
पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा, बैठकीत चर्चा करताना विराट कोहली आणि इतर..