आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनीने अचानक दिला धक्का, नवी जबाबदारी समजताच रडला होता विराट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅप्टन कूल म्हणून प्रसिद्ध असलेल्या महेंद्रसिंह धोनीने डिसेंबर 2014 मध्ये अचानक कसोटी क्रिकेटमधून संन्यास घेऊन सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. 30 डिसेंबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न येथे खेळण्यात आलेला कसोटी सामना त्याच्या कारकिर्दमधील शेवटचा ठरला. धोनीनंतर भारतीय कसोटी संघाचे नेतृत्त्व विराट कोहलीकडे सोपवण्यात आले. मात्र, आपली जबाबदारी कळताच विराटला रडू कोसळले होते.

विराटने एका इंटरव्ह्यूमध्ये खुलासा केला, की नव्या जबाबदारीचे वृत्त कानावर पडताच त्याला रडू कोसळले होते. खांद्यावर अचानक पडलेली मोठी जबाबदारी आपल्याकडून पेलवली जाईल की नाही, असाही प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला होता.

इंटरव्ह्यूमध्ये आणखी काय म्हणाला विराट?
- धोनीने कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर माझ्यावर मोठी जबाबदारी आली. खरे सांगायचे तर, संघाचे नेतृत्व करावे लागेल, असा विचारच कधी मनात आला नव्हता.
- ऑस्ट्रेलियामध्ये यादरम्यान विराटची गर्लफ्रेंड अनुष्काही होती. विराटने तिला नव्या जबाबदारीविषयी सांगितले. त्यावेळी त्याचे डोळे पाणावले होते. तिलाही आश्चर्याचा धक्का बसला होता.
- भारतासाठी खेळण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र भारतीय संघाचा कर्णधार होईल, असे त्याला कधीच वाटले नव्हते. विशेषतः एवढ्या कमी वयात.

विराटला जानेवारी 2015 मध्ये सिडनीयेथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेत शेवटच्या कसोटीत नेतृत्व करण्याची संधी मिळाली. चार कसोटी मालिकेच्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये धोनीने नेतृत्व केले होते. यानंतरच त्याने निवृत्ती घेतली.
पुढील स्लाइड्सवर पाहा आणि जाणून घ्या, मागील तीन वर्षात निवृत्त झालेले दिग्गज क्रिकेटर आणि त्यांचे विक्रम