आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Virat Kohli Highest Paid Player In IPL, Followed By Dhoni, Dhawan

विराट काेहली सर्वाधिक महागडा, महेंद्रसिंग धाेनीची घसरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय कसाेटी टीम आणि बंगळुरू राॅयल चॅलेंजर्सचा कर्णधार विराट काेहलीने इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) महेंद्रसिंग धाेनीला पिछाडीवर टाकले. सध्या फाॅर्मात असलेला काेहली आगामी आयपीएलमध्ये सर्वात महागडा खेळाडू झाला आहे. त्याला १५ काेटींची किंमत मिळाली आहे. आयपीएलने शुक्रवारी खेळाडूंच्या मूळ वेतनाची आकडेवारी जाहीर केली. यात काेहली हा धाेनीपेक्षाही वरचढ ठरला.

आयकाॅन असलेल्या विराट काेहलीला बंगळुरू टीमकडून १२.५ काेटी मिळणार हाेते. मात्र, या टीमने त्याला आपल्याच खासगी काेट्यातून १५ काेटी देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता विराट हा आगामी लीगमध्ये सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.
यापूर्वी चेन्नई टीमने धाेनीला सर्वाधिक २० काेटी दिले हाेते. मात्र, ही टीम निलंबित झाली. आत धाेनीला १२.५ काेटी मिळतील. ताे आता दाेन वर्षे नवीन पुणे टीमकडून खेळणार आहे.

गंभीर, राेहितला फटका : पर्स कपातीचा फटका काेलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार गाैतम गंभीरसह मुंबईच्या राेहित शर्मा, पंजाबच्या मिलरला बसत आहे. याच कपातीमुळे गंभीरला १२.५० च्या बदली १० काेटी, राेहितला १२.५० च्या बदल्यात ११.५० काेटी, मिलरला १२.५० च्या बदल्यात केवळ ५ काेटी मिळणार आहेत.

हरभजन, गेलचाही दबदबा : बंगळुरू टीममधील क्रिस गेल व मुंबई टीमचा हरभजन सिंग, मलिंगा, अंबाती रायडूला दबदबा कायम ठेवला. बंगळुरूच्या पर्समधून गेलसाठी ७.५० काेटींची कपात हाेते. मात्र, आता त्याला टीम ८.४० काेटी देणार आहे. हरभजनला ५.५० काेटींच्या बदल्यात आता आठ काेटी, मलिंगाला ७.५० च्या बदल्यात ८.१० काेटी, रायडूला ४ च्या बदल्यात ६ काेटी रुपये मिळणार आहेत.

पुढे जाणून घ्या, बोलीची आकडेवारी...