आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Virat Kohli Illness Before India Vs Pakistan Hi voltage Match, Champions Trophy 2017

विराट पडलाय आजारी, IND Vs PAK फायनलआधी चाहत्यांमध्ये धाकधूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - भारत-पाकिस्तानचा सामना म्हणजे प्रत्येकाच्या जिवाभावाचा सामना असतो. भारत-पाक सामना कुठल्याही फायनलपेक्षा कमी नसतो. आता तर तब्बल 10 वर्षांनी आयसीसीच्या एखाद्या स्पर्धेच्या फायनलमध्ये दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने आले आहेत. फायनलला काही तास शिल्लक असताना भारतीय कर्णधार विराट कोहली आजारी असल्याची बातमी येत आहे. या बातमीमुळे भारतीय चाहते मात्र कमालीचे तणावात आले आहेत. 
सूत्रांनुसार, कोहलीला डोकेदुखी होत असून त्यासाठीचे औषधोपचार सुरू आहेत.
 
भारत- पाक हायव्होल्टेज सामना
याआधी भारताने 2007मध्ये टी 20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पाकला हरवले होते. किताबाची प्रबळ दावेदार टीम इंडिया आणि अंडरडॉग म्हणून हिणवली जाणारी पाकिस्तानी टीम रविवारी जबरदस्त संघर्ष करतील.
- या वेळीही टीम इंडियाला विजयाची प्रबळ दावेदार मानले जात आहे. परंतु पाकिस्तानी संघाने ज्याप्रकारे मागचे तीन सामने खेळले आहेत, त्यावरून विराट कोहलीला सतर्क राहण्याची गरज आहे. ही हायव्होल्टेज फायनल 18 जूनला खेळली जाईल.
-  तत्पूर्वी, भारताचा कर्णधार विराट कोहली लवकर बरा व्हावा यासाठी क्रिकेट चाहत्यांनी प्रार्थना केली आहे.
बातम्या आणखी आहेत...