आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोहली उत्तम लीडर आहे, गांगुलीकडून कोहलीची स्तुती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने कसोटी कर्णधार विराट कोहलीची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. कोहली आक्रमक स्वभावाचा असून तो नेहमी विजयासाठी प्रयत्नशील असतो. हा त्याच्यातला गुण सर्वाधिक महत्त्वाचा आहे, असे गांगुलीने म्हटले.
"कोहली उत्तम लीडर आहे. तो आणखी चांगला नेता होऊ शकेल. मी कोहलीला सांगू इच्छितो की ही आक्रमकता भारतात ठीक आहे. मात्र, विदेशात असा डंका वाजवून दाखवा. विदेशात असा जोश, उत्साह, आक्रमकता ठेवता आली पाहिजे,' असे मत भारताच्या या माजी खेळाडूने नमूद केले. मला कोहली आवडतो. तो मैदानावर असणे फायद्याचे ठरते. तो खूप उत्साह, जोश आणि आक्रमकपणा दाखवतो. त्याच्याकडून भारताला आणखी विजयाची आशा आहे, असेही गांगुलीने म्हटले. कोहलीच्या नेतृत्वात भारताने श्रीलंकेला श्रीलंकेत पराभूत केले. यानंतर चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत द. आफ्रिकेला २-० ने पछाडले आहे.