आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • VIRAT KOHLI IS NEW CAPTAIN OF INDIAN CRICKET TEAM OF ONE DAY & T 20 FORMAT

वन डे, टी- 20 फॉर्मेटमध्येही विराटच कर्णधार, धोनी दूर होताच युवराजला संघात स्थान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- इंग्लंडविरूद्धच्या वनडे आणि टी 20 सीरीजसाठी अपेक्षेप्रमाणे विराट कोहलीची कर्णधारपदी निवड झाली आहे. दुसरीकडे, वरिष्ठ क्रिकेटर युवराज सिंगला अनेक काळानंतर भारतीय संघात स्थान दिले गेले आहे. तसेच दोन दिवसापूर्वी कर्णधारपद सोडलेल्या धोनीला वन डे तसेच टी-२० संघात स्थान दिले गेले आहे.
 
वन डे टीम अशी आहे-
 
वनडेः विराट कोहली (कर्णधार), एमएस धोनी, केए राहुल, शिखर धवन, मनीष पांडे, केदार जाधव, युवराज सिंग, अजिंक्य रहाणे, हार्दिक पंड्या, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव.
 
 
टी20ः विराट कोहली (कर्णधार), एमएस धोनी, मंदीप सिंह, केएल राहुल, युवराज सिंह, सुरेश रैना, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, मनीष पांडे, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, आशीष नेहरा.

अडीच तासानंतर बैठक सुरु-
 
टीम सिलेक्शन मीटिंग मुंबईत सुमारे अडीच तासानंतर सुरु झाली. सुप्रीम कोर्टाने बनवलेल्या लोढा कमेटीने बीसीसीआयच्या पाच सदस्यीय सिलेक्शन पॅनेलला टीम सिलेक्शनची परवानगी दिली. याआधी यावरून संभ्रम होता की, सिलेक्टर्सची मीटिंग होणार की नाही.  12.30 वाजता सुरु होणारी बैठक अखेर 3 वाजता सुरु झाली.
 
सुरेश रैनाला दिले नाही स्थान- 
 
- सुरेश रैना एक वर्षापासून वन डे टीममधून बाहेर आहे. त्याने शेवटचा वनडे 25 ऑक्टोबर, 2015 रोजी दक्षिण अफ्रिकेविरूद्ध खेळला होता.
- यानंतर रैनाला न्यूझीलंडविरूद्धच्या ५ सामन्याच्या वनडे सीरीजसाठी संघात स्थान दिले गेले होते. पण तापाने फणफणल्याने तो एकही मॅच खेळू शकला नाही.
 
वनडे सीरीजचे वेळापत्रक
 
पहिला वनडेः 15 जानेवारी, पुणे
दुसरा वनडेः 19 जानेवारी, कटक
तिसरा वनडेः 22 जानेवारी, कोलकाता
 
टी- 20 सीरीजचे वेळापत्रक
 
पहिला टी 20: 26 जानेवारी, कानपुर
दुसरा टी 20: 29 जानेवारी, नागपुर
तिसरा टी 20: 1 फेब्रुवारी, बंगळुरु.
 
पुढे स्लाईडद्वारे वाचा, धोनी दूर होताच युवराजला संघात स्थान मिळाल्यानंतर सोशल मिडियात आलेल्या प्रतिक्रिया...
बातम्या आणखी आहेत...