कराची - जगात सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंत विराट कोहलीचे नाव आहे. परंतु चक्क टीम इंडियाचा कर्णधार विराटसारखाच दिसणारा एक व्यक्ती कराचीत एका पिझ्झा आऊटलेटमध्ये पिझ्झा बनवताना पाहिला जाऊ शकतो. या व्यक्तीचा व्हिडिओ फेसबुकवर व्हायरल होत आहे, ज्यात तो पिझ्झा बनवताना दिसून येतो. कराचीच्या शहीद ए मिल्लतमध्ये एका पिझ्झा स्टोअरवर काम करणारा कर्मचारी हुबेहूब भारतीय कर्णधारासारखाच दिसतो. त्याला पाहून तुम्हीही चकित व्हाल.
विराटचे अनेक आहेत Look alike
- पाकिस्तानी क्रिकेटर अहमद शहजादलाही पाक चाहते विराट म्हणून पुकारतात. त्याचा चेहरा विराटशी मिळताजुळता आहे. सुरुवातीला शहजादही विराटच्या खेळण्याची स्टाइल कॉपी करत होता.
- 2016 मध्ये कानपूरमध्ये एका टेस्ट सामन्यात विराटचा Lookalike समोर आला होता.,
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा विराटसारख्या दिसणाऱ्या तरुणाचे फोटोज...