आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराट काेहलीचे आर्जव, विश्रांतीसाठी विनंती; बांगलादेश दाैऱ्यास अनुत्सुक!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - विश्वचषकापाठाेपाठ आठव्या सत्राच्या आयपीएलमुळे यंदा भारतीय खेळाडूंचे वेळापत्रक अधिकच व्यग्र राहिले आहे. टीम पुढच्या महिन्यात बांगलादेश दाैऱ्यावर जाणार आहे. या दाैऱ्यासाठी २० मे राेजी भारतीय संघाची घाेषणा करण्यात येईल. मात्र, सलगच्या क्रिकेट स्पर्धांमुळे विराट काेहलीने शारीरिक थकवा घालवण्यासाठी विश्रांतीचा निर्णय घेतला आहे.

रहाणेला संधी
काेहलीच्या अनुपस्थितीमध्ये कसाेटीत भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी अजिंक्य रहाणेला आहे. यासाठी त्याच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्याचबराेबर या नेतृत्वाच्या स्पर्धेत रहाणेसह राेहित शर्मा, सुरेश रैना व पुजाराच्या नावाचाही समावेश आहे.
बातम्या आणखी आहेत...