आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाेल्टला पिछाडीवर टाकून विराट काेहली अव्वल!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - शीघ्रकाेपी स्वभावाने वाढत्या वादामुळे सध्या भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट काेहली सर्वांच्या चर्चेचा विषय झाला आहे. इंग्लंडच्या एका अर्थ-क्रीडाविषयक नियतकालिकाने नुकत्याच जाहीर केलेल्या यादीत विराट काेहलीला सहावे स्थान दिले आहे. या नियतकालिकाने सध्याच्या आणि आगामी तीन वर्षांतील बाजाराच्या शक्यतांचा सखाेल अभ्यास करून यादी तयार केली आहे.

विराट काेहलीने आपल्यातील काैशल्यातून जमैकाचा युसेन बाेल्ट (धावपटू) नाेवाक याेकाेविक (टेनिस), क्रिस्टियानाे राेनाल्डाे, लियाेनेल मेसी (फुटबाॅल) यासारख्या जगातील नंबर वन खेळाडूंनाही पिछाडीवर टाकण्याची किमया साधली आहे. इंग्लंडच्या ‘स्पाेर्ट्स प्राे’ने यंदाच्या बाजारातील हालचालीवर ५० सर्वात विश्वसनीय आणि कायमस्वरूपी खेळाडूंचा समावेश असलेली यादी जाहीर केली. यात विराट काेहलीच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकण्यात आला.

स्टार चेहरे
- लुईस हॅमिल्टन (एफ-१, ५ वे स्थान)
- युसेन बाेल्ट (१० वा)
- क्रिस्टियानाे राेनाल्डाे (१६ वे स्थान),
- याेकाेविक (१४ वा)
- लियाेनेल मेसी (२२ वे स्थान)

विराट कोहलीची ही आहेत खास वैशिष्ट्ये
१ काेेहली अनेक माेठ्या ब्रँडचे प्रतिनिधित्व करत आहे.
२ भारताच्या आधुनिक क्रिकेटचा काेहली प्रतीक आहे.
३ आयपीएलमध्ये काेहलीच्या नेतृत्वात बंगळुरूची प्ले ऑफमध्ये दाखल.

सायना ४४ व्या स्थानावर
जगातील नंबर वन बॅडमिंटनपटू सायना नेहवालला ४४ वे स्थान मिळाले आहे. तिने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान गाठून आपला जाहिरातीच्या मार्केटमधील दबदबा अधिक वाढवला आहे.
बातम्या आणखी आहेत...