आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसोटीमध्‍ये काेहली दुसऱ्या क्रमांकावर; जडेजा, अश्विन अाॅलराउंडरच्या टाॅप-5 मध्ये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई- जबरदस्त फाॅर्मात असलेल्या टीम इंडियाच्या कर्णधार विराट काेहलीची नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरुद्ध कसाेटी मालिकेतील खेळी विक्रमी ठरली. त्याने  झंझावाती खेळी करताना एकापाठाेपाठ विक्रमाला गवसणी घातली. यात त्याच्या द्विशतकाच्या विक्रमाचा समावेश अाहे. याच द्विशतकामुळे टीम इंडियाला माेठा फायदा झाला. याशिवाय काेहलीने याच द्विशतकाच्या बळावर अायसीसीच्या क्रमवारीमध्ये माेठी प्रगती साधली. त्याने दुसऱ्या स्थानावर धडक मारली. यासाठी त्याला मालिकेतील सर्वाधिक एकूण ६१० धावांचा पल्लाही महत्त्वाचा ठरला. यादरम्यान मालिकेत सलामीवीर अाणि मालिकावीर पुरस्काराचा बहुमान पटकावला. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने ही कसाेटी मालिका १-० ने जिंकली.  

 
अायसीसीने नुकतीच कसाेटीची क्रमवारी जाहीर केली. यामध्ये काेहलीला तीन स्थानांचा माेठा फायदा झाला. त्याने दुसरे स्थान गाठलले. त्याला गत अाठवड्यात ८७७ रेटिंग गुणांच्या अाधारे पाचव्या स्थानी धडक मारता अाली हाेती. त्यानंतर त्याने मालिकेत सरस फलंदाजी केली. यामधील शतकी खेळी ही त्याच्यासाठी फायदेशीर ठरली. यातुन त्याला १६ रेटिंग गुणांचा फायदा झाला. अाता त्याच्या नावे एकूण ८९३ गुणांची नाेंद झाली. यादरम्यान दुसरे स्थान गाठता त्याने अापल्याच देशाच्या चेतेश्वर पुजारा, ज्याे रुट अाणि केन विलियम्सनला मागे टाकले. या तिघांचीही क्रमवारीत घसरण झाली. अाॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ हा अव्वल स्थानावर कायम अाहे. त्याचे ९३८ गुण अाहेत. अायसीसीच्या फलंदाजी, गाेलंदाजी अाणि अाॅलराउंडर, अशी तीन प्रकारची क्रमवारी जाहीर केली जाते. 


काेहलीला तिन्ही फाॅरमॅटमध्ये नंबर वनची संधी 
भारताचा कर्णधार विराट काेहली हा सध्या क्रिकेटच्या तिन्ही फाॅरमॅटमध्ये वरचढ ठरणारी खेळी करत अाहे.  यात कसाेटीसह वनडे अाणि झटपट टी-२० चा समावेश अाहे. यातून त्याला या तिन्ही फाॅरमॅटमध्ये जगातील नंबर वन हाेण्याची संधी अाहे. सध्या ताे वनडे अाणि टी-२० मध्ये नंबर वन फलंदाज अाहे. अाता त्याला कसाेटीत ४६ रेटिंग गुणांची कमाई करून कसाेटीतही नंबर वनचे सिंहासन गाठण्याची संधी अाहे. त्याचे ८९३ गुण अाहेत. स्मिथ ९३८ गुणांसह अव्वल स्थानी अाहे.


पुढील स्लाइडवर वाचा, क्रमवारीच्या प्रत्येक गटात टीम इंडियाचे प्रत्येकी दाेन खेळाडू...

बातम्या आणखी आहेत...