आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराट कोहली मैदानावरच झाला संतप्त, पंच कुमार धर्मसेनाशी घातला वाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद- रॉयल चॅलेंजर्सचा कर्णधार विराट कोहली काल (शुक्रवार) रात्री सनरायजर्स हैदराबादसोबत झालेल्या सामन्यात फिल्ड एम्पायर कुमार धर्मसेना यांच्यावर संतप्त झाला. पावसामुळे हा सामना 20 ओव्हरवरुन कमी करुन 11 ओव्हरचा करण्यात आला होता. यावेळी मैदान जरा ओले होते आणि हातातून बॉल घसरत होता. एम्पायरने सामना रोखावा, अशी मागणी कोहलीने केली होती. पण तसे झाले नाही. त्यामुळे विराट कोहली आणि विकेटकिपर दिनेश कार्तिक एम्पायरसोबत चांगलेच भांडले.
असे झाले भांडण
हैदराबादची बॅटिंग सुरु होती. यावेळी जरा पाऊस येत होता. बॉलवर ग्रीप बसवणे कठिण जात होते. अखेरच्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर कोहलीने एका शॉट रोखण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या हातातून बॉल घसरला. यावेळी याची तक्रार कोहलीने एम्पायरकडे केली. बॉल ओला झाला असल्याचे त्याने सांगितले. पण धर्मसेना काही ऐकण्याच्या मुडमध्ये नव्हते. दोन बॉल टाकल्यावर पहिला डाव संपला. यावेळी काहली आणि कार्तिक धर्मसेना यांच्याजवळ गेले. त्यांच्याशी चर्चा करु लागले. पण जरा वेळात चर्चेने भांडणाचे रुप धारण केले. त्यानंतर दुसरे एम्पायर अनिल चौधरी येथे दाखल झाले. त्यांनी दोघांना शांत केले. पण त्यानंतरही धर्मसेना जरा रागावलेले दिसून आले.
काही दिवसांपूर्वी मिळाला होता इशारा
विराट कोहली मैदानावर कसा वागतो यावर आमचे लक्ष आहे, असे बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. वर्ल्डकप सामन्यात विराट एका पत्रकारासोबत भांडला होता. यापूर्वी ऑस्ट्रेलिया टूरवर असताना ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूसोबत त्याचे भांडण झाले होते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, विराट कोहली आणि दिनेश कार्तिक कसे भांडणे एम्पायर धर्मसेना यांच्यासोबत...