आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG विराटच्या बॅटला तब्बल 100 कोटींची स्पॉन्सरशिप, आतापर्यंत सर्वात जास्त...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विराट कोहलीने त्याच्या बॅटला स्पॉन्सर करणारी कंपनी MRFशी कराराचे नूतनीकरण केले आहे. वृत्तानुसार, हा करार तब्बल 100 कोटींचा आहे. - Divya Marathi
विराट कोहलीने त्याच्या बॅटला स्पॉन्सर करणारी कंपनी MRFशी कराराचे नूतनीकरण केले आहे. वृत्तानुसार, हा करार तब्बल 100 कोटींचा आहे.
स्पोर्टस डेस्क - टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली पुन्हा एकदा त्याच्या एंडोर्समेंट डीलमुळे चर्चेत आहे. या वेळी ही डील त्याच्या बॅटवर लागणाऱ्या स्टिकरकरिता झाली आहे. त्याचा मोबदला म्हणून त्याला तब्बल 110 कोटी रुपये मिळतील. या डीलसह विराटने बॅट स्पॉन्सरशिपच्या कमाईत आतापर्यंतच्या सर्व क्रिकेटपटूंना मागे टाकले आहे. या आधी विराटने प्युमासोबतही 110 कोटींचा करार केला होता, परंतु तो स्पोर्ट्स लाइफस्टाइलसाठी झाला होता. 
 
8 वर्षांसाठी झालाय करार...
- विराटचा हा करार टायर कंपनी MRFशी झाला आहे. या कंपनीने आधीही विराटच्या बॅटला स्पॉन्सर केले आहे. नव्या करारानुसार, पुढच्या 8 वर्षांदरम्यान विराट तब्बल 110 कोटी रुपये मिळतील.
- भारतीय कर्णधाराच्या करारांना मॅनेज करणाऱ्या कंपनीचे सीईओ बंटी सजदेह म्हणाले की, विराटला पूर्वीपेक्षा चांगली रक्कम या करारातून मिळणार आहे.
- MRFशी विराटचा याआधीचा करार 3 वर्षांसाठी 8 कोटी रुपयांत झाला होता. तथापि, नव्या कराराबद्दल अधिक माहिती सांगण्यास कंपनीने नकार दिला.
- सजदेह म्हणाले, आम्ही MRFशी नव्याने 8 वर्षांचा करार केला आहे. MRF कोहलीसोबत दीर्घकाळ राहण्यास उत्सुक होती. 
- स्पॉन्सरशिपच्या बाबत विराट गतवर्षीच 100 कोटी क्लबमध्ये सामील झाला होता. तेव्हा त्याने 13 ब्रँड साइन केले होते. 
- MRFशी या करारानंतर विराट जगभरातील क्रिकेटपटूंपेक्षा स्पॉन्सरशिप कमाईच्या बाबतीत सर्वात पुढे गेला आहे. त्याने धोनी आणि डिव्हिलियर्सलाही मागे टाकले.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा टीम इंडियाचे स्टार खेळाडू आपल्या बॅटवर कोणत्या कंपनीचे स्टिकर लावतात...
बातम्या आणखी आहेत...