आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनी कर्णधारपद सोडणार असल्याचे विराटला दीड महिना आधीच कळले होते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - विराट कोहलीने मान्य केले की धोनीचे कर्णधारपद सोडण्याचे त्याला दीड महिना अगोदरच समजले होते. कोहली त्या वेळी मोहालीत टेस्ट खेळत होता. एका इंटरव्ह्यूमध्ये कोहली म्हणाला की, मी खूप भावुक झालो होतो, जेव्हा मला हे कळले की  टेस्ट क्रिकेटनंतर वनडे आणि टी 20चाही मला कर्णधार बनवणार आहेत. त्या वेळी त्याची प्रेयसी अनुष्काही त्याच्यासोबत होती.
 
नोव्हेंबरमध्ये विराटला आला फोन, जानेवारीत धोनीने सोडले कर्णधारपद...
- 4 जानेवारी 2017 रोजी धोनी कर्णधारपद सोडत असल्याची बातमी आली होती. धोनीने बीसीसीआयला ईमेल करून राजीनामा पाठवला होता. धोनीने जसे अचानक टेस्टचे कर्णधारपद सोडले, तसाच हाही निर्णय अचानक घेतला असल्याचे तेव्हा म्हटले जात होते.
- परंतु विराटच्या मतानुसार, त्याला मोहाली टेस्टदरम्यानच याबद्दल सांगण्यात आले होते. टीम इंडियाचा 26 ते 28 नोव्हेंबरदरम्यान इंग्लंडविरुद्ध मोहालीमध्ये कसोटीचा सामना झाला. विराटने हा खुलासा एका क्रीडा वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.
- विराटच्या वक्तव्यावरून हे स्पष्ट होते की, धोनीने अचानक कर्णधारपद सोडले नव्हते, जसे की म्हटले जात आहे. यात बीसीसीआयचे पूर्वनियोजन होते. कोहलीला याबाबत इंग्लंडविरुद्ध वनडे सिरीजच्या दीड महिना आधीच कळवण्यात आले होते.
 
कुणाच्या सांगण्यावरून धोनीने कर्णधारपद सोडले? ... ईमेलमध्ये हे म्हटले...
- सूत्रांनुसार, धोनी कुणाच्या तरी सांगण्यावरून राजीनामा दिला होता. 4 जानेवारी रोजी रात्री धोनीने बीसीसीआयला पाठवलेल्या ईमेलमधून हे स्पष्ट होते की धोनीने स्वत:च्या मर्जीने नाही तर कुणाच्या तरी सांगण्यावरून हटण्याचा निर्णय घेतला.
 
धोनीने लिहिले होते, विराटचा मेंटर बनण्यासाठी तयार आहे...
- धोनी ईमेल मध्ये म्हटले होते की, मी भारताच्या वनडे संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देत आहे आणि विराट कोहलीचा मेंटर बनण्यास तयार आहे.
- धोनीच्या ईमेलची ही ओळ महत्त्वाची आहे. या ओळीवरून त्याने स्वत:च्या मर्जीने नव्हे तर कुणाच्या तरी सांगण्यावरून राजीनामा दिला हे स्पष्ट होते. याचा अर्थ त्याने कुणाच्या तरी म्हणण्याला होकार दिला.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा धोनीची महत्त्वाची कामगिरी आणि काही फोटोज....
बातम्या आणखी आहेत...