आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रमवारीत कोहलीची चौथ्या स्थानी घसरण, न्यूझीलंडच्या विल्यम्सनची दुसऱ्या क्रमांकावर प्रगती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई- न्यूझीलंड-द. आफ्रिका आणि बांगलादेश-श्रीलंका कसोटीनंतर आयसीसीने ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केलीआहे. ड्युनेडिन कसोटीत शतक ठोकणारा न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनला दोन स्थानंाचा फायदा झाला असून, आता तो नंबर वन स्टिवन स्मिथनंतर दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. 

विल्यम्सनला फायदा झाल्याने भारताचा कर्णधार विराट कोहली आणि इंग्लंडचा कर्णधार जो. रुट यांची क्रमवारीत घसरण झाली. रुट आता तिसऱ्या तर कोहली चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. टॉप-१० मध्ये हाशिम आमलाला २ स्थानांचे नुकसान झाले. तो आता नवव्या क्रमांकावर घसरला आहे. 

क्विंटन डीकॉकला ७ स्थानांचे नुकसान झाले असून, तो टॉप-१० बाहेर १७ व्या स्थानी घसरला आहे. ए.बी.डिव्हिलर्स १० व्या स्थानी आला आहे. अझहर अली आणि युनिस खान यांना प्रत्येकी एका स्थानाचा फायदा झाला. टॉप-१० बाहेर आफ्रिकेचा एल्गर १० स्थानांची झेप घेऊन अकराव्या तर डुप्लेसिस २ स्थानांच्या प्रगतीसह १९ व्या स्थानी आहे.

टॉप-१० फलंदाज
१. स्टिवन स्मिथ, ऑस्ट्रेलिया    ९३६  
२. केन विल्यम्सन, न्यूझीलंड    ८६९  
३. जो. रुट, इंग्लंड    ८४८  
४. विराट कोहली, भारत    ८४७  
५. डेव्हिड वॉर्नर, ऑस्ट्रेलिया    ७९४  
६. चेतेश्वर पुजारा, भारत    ७९३  
७. अझहर अली, पाकिस्तन    ७७९  
८. युनिस खान, पाकिस्तान    ७७२  
९. हाशिम आमला, आफ्रिका    ७५७  
१०. ए.बी.डिव्हिलर्स, आफ्रिका    ७४७

अश्विन, जडेजा नंबर वन कायम
टॉप-१० गोलंदाजांत बदल झालेला नाही. आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा दोघेही अव्वलस्थानी कायम आहेत. अष्टपैलूंच्या यादीत बांगलादेशचा सकिब-अल-हसन दुसऱ्या क्रमांकावर घसरला असून, अश्विन पुन्हा नंबर १ खुर्चीवर विराजमान झाला आहे. याशिवाय टॉप-१० मध्ये बदल नाही.  
बातम्या आणखी आहेत...