आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पराभवानंतर वेस्‍ट इंडीजच्‍या ड्रेसिंग रूममध्‍ये गेली टीम इंडिया, कोहलीकडून जर्सी गिफ्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विराटने वेस्ट इंडियन ड्रेसिंग रूममध्‍ये जाऊन गेलसोबत सेल्‍फी घेतली. - Divya Marathi
विराटने वेस्ट इंडियन ड्रेसिंग रूममध्‍ये जाऊन गेलसोबत सेल्‍फी घेतली.
नवी दिल्ली - वर्ल्डकप सेमीफायनलमध्‍ये पराभूत झाल्‍यानंतर टीम इंडिया वेस्ट इंडीजच्‍या ड्रेसिंग रूममध्‍ये गेली होती. दरम्‍यान टीम इंडियाच्‍या खेळाडूंनी वेस्ट इंडियन प्लेयर्ससोबत सेल्फीही घेतली होती. विराटने त्‍याची मॅच जर्सी ऑलराउंडर ब्रेथवेटला गिफ्ट दिली. या जर्सीवर कोहलीने साइनही केली. दरम्‍यान हरभजनसिंगनेही लेंडल सिमंसला शुभेंच्‍छा दिल्‍या. विमानतळावर कोहली-धोनीचे नारे..

- विराटने गेल आणि ब्रेथवेटसोबत सेल्‍फी घेतली.
- ब्रेथवेटने विराटसोबतची सेल्फी सोशल मीडियावर शेयर केली.
- ब्रेथवेटने वेस्ट इंडियन ड्रेसिंग रूममध्‍ये आल्‍याबद्दल विराटला धन्‍यवाद दिले.
- वर्ल्ड टी20 मध्‍ये पराभवानंतर टीम इंडिया गुरुवारी मुंबई एयरपोर्टवर दिसली.
- सर्वात आधी सिक्युरिटी चेकजवळ विराट दिसला.
- त्‍याला पाहताच चाहत्‍यांनी 'कोहली-कोहली', 'वी आर प्राउड ऑफ यू कोहली' असे नारे दिले.
- कोहलीसोबत धोनी, आशीष नेहरा, बुमराह यांच्‍या नावाचेही नारे लागले.
वर्ल्डकप आठवणीत राहिल..
- विराट कोहली म्‍हणाला, ''यापराभवानंतर पुढच्‍या वेळी आपण पूर्ण शक्‍तीने पुनरागमन करू.''
- विराटने इंस्टाग्राम अकाउंटवर टीम मेंबर्संना भाई म्‍हणून त्‍यांचे आभार मानले.
- कोहलीने लिहीले, “ चुकांमधून शिकत आपण पुढे जात राहू.”
- “ या स्‍पर्धेला यादगार बनवण्‍यासाठी धन्‍यवाद.”
शुक्रवारी केले ट्विट..
- शुक्रवारी एक ट्विट करून विराट म्‍हणाला, ''कधीही आशा सोडायची नाही. जीवन कधी संपत नसते. ही केवळ सुरूवात आहे.''
पुढे पाहा, वेस्‍ट इंडीजच्‍या ड्रेसिंग रूममधील टीम इंडियाचे फोटो..