आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराट काेहली अव्वलस्थानी कायम; धाेनी टाॅप-10 बाहेर, टाॅप-१०मध्‍ये एकही गोलंदाज नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई - टीम इंडियाचा कर्णधार विराट काेहलीने वनडे क्रमवारीतील अापले अव्वल स्थानावरचे  वर्चस्व अबाधित ठेवले अाहे. ताे फलंदाजांच्या क्रमवारीमध्ये जगात नंबर वन अाहे. अायसीसीने शुक्रवारी अापली वनडेची क्रमवारी जाहीर केली. यामध्ये विराट काेहली चमकला. त्यापाठाेपाठ फलंदाजांच्या क्रमवारीमध्ये अाॅस्ट्रेलियाचा डेव्हिड वाॅर्नर दुसऱ्या स्थानावर अाहे. या दाेघांमध्ये अाता १२ गुणांचे अंतर अाहे.

मात्र, अापले अव्वल स्थान अधिक मजबूत करण्याची विराट काेहलीला संधी अाहे. येत्या रविवारपासून श्रीलंकेविरुद्ध पाच वनडे aामन्यांच्या मालिकेला सुरुवात हाेणार अाहे. या मालिकेत सरस फलंदाजी करण्याचा काेहलीचा प्रयत्न असेल. यातून त्याला क्रमवारीतील अापले स्थान कायम ठेवता येईल. त्याची नुकत्याच झालेल्या कसाेटी मालिकेतील कामगिरी उल्लेखनीय ठरली. अाता वनडे मालिकेमध्ये सरस फलंदाजीसाठी काेहली प्रयत्नशील राहील.  त्यामुळे या मालिकेमध्ये सर्वांची त्याच्यावर खास नजर असेल.  अाॅस्ट्रेलियाचा डेव्हिड वाॅर्नरही प्रगती साधण्याचा प्रयत्न करेल.

धाेनी १२ व्या स्थानावर
टीम इंडियाचा महेंद्रसिंग धाेनी हा फलंदाजांच्या क्रमवारीत १२ व्या स्थानावर अाहे. त्याला यामध्ये प्रगती साधण्याची संधी अाहे. श्रीलंकेविरुद्ध  मालिकेत उल्लेखनीय कामगिरीचा त्याचा प्रयत्न असेल. यातून त्याला क्रमवारीत सुधारणा करता येईल.   शिखर धवन १३ व्या स्थानावर अाहे. काेहली वगळता इतर काेणत्याही भारतीय फलंदाजाला टाॅप-१० मध्ये स्थान मिळाले नाही.

वनडे मालिकेसाठी टीम इंडियाचा कसून सराव
कसाेटीपाठाेपाठ अाता  श्रीलंकेविरुद्धची वनडे मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघ उत्सुक अाहे. यासाठी भारताच्या खेळाडूंनी कसून सरावावर भर दिला. मागील दाेन दिवसांपासून खेळाडू मैदानावर नेट प्रॅक्टिस करत अाहेत. येत्या रविवारपासून भारत अाणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिकेला सुरुवात हाेईल. गॅलेच्या मैदानावर सलामीचा सामना हाेईल.

भारत तिसऱ्या स्थानावर
टीमच्या क्रमवारीत भारतीय संघ तिसऱ्या  स्थानावर अाहे. भारताच्या नावे अाता ११४ गुण अाहेत. श्रीलंकेविरुद्धची वनडे मालिका जिंकून अापले हे स्थान मजबूत करण्यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील राहील. मात्र, ही या मालिकेतील ३-२ च्या विजयाचाही माेठा फटका टीम इंडियाला बसू शकताे. यामुळे ११३ रेटिंग गुणांसह भारताची चाैथ्या स्थानावर घसरण हाेईल.
 
बातम्या आणखी आहेत...