आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्लंड वनडे- टी-20 सीरीजसाठी आज भारतीय संघाची निवड, विराट बनणार कर्णधार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महेंद्रसिंग धोनीने वनडे आणि टी-२० चे कर्णधारपद सोडल्यानंतर आता कसोटी कर्णधार विराट कोहली तिन्ही स्वरूपांत भारताचा कर्णधार बनेल, हे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीय निवड समिती शुक्रवारी इंग्लंडविरुद्ध तीन वनडे आणि टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची निवड करील, त्या वेळी विराट कोहली खेळाच्या तिन्ही स्वरूपांचा कर्णधार बनेल. निवड समिती शुक्रवारी संघ निवड करील, तेव्हा कोहली वनडे, टी-२० कर्णधार बनणे हे निश्चित आहे. कोहलीने मागच्या वर्षी कसोटीत भारताला नंबर वन टीम बनवताना टीम इंडियाला शिखरावर पोहोचवले.
   
धोनीने विश्रांती घेतली तेव्हा संधी मिळाली म्हणून कोहलीने आतापर्यंत १७ वनडेत कर्णधारपद भूषवले आहे. कोहली प्रथमच अधिकृतरीत्या वनडे आणि टी-२० कर्णधार बनेल. कोहली टी-२० मध्ये पहिल्यांदा कर्णधार बनेल. टी-२० मध्ये धोनीशिवाय सेहवागने एका सामन्यात, सुरेश रैनाने ३ सामन्यांत, रहाणेने २ सामन्यांत नेतृत्व केले आहे.
  
रोहित, रहाणे बाहेर : मुंबईचे दोन फलंदाज रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे दुखापतीमुळे संघाबाहेर झाले आहेत. यामुळे फॉर्मात नसलेला शिखर धवन फिट असेल तर तो लोकेश राहुलसोबत सलामीला खेळू शकतो. निवड समिती एखाद्या युवा खेळाडूलासुद्धा आजमावू शकते. कर्नाटकचा फलंदाज राहुल न्यूझीलंडविरुद्ध वनडेत दुखापतीमुळे बाहेर झाला होता. तेव्हा धवनच्या अंगठ्यात दुखापत झाली होती आणि तोसुद्धा बाहेर होता. धवनने अखेरचा वनडे सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध मागच्या जानेवारीत खेळला होता. 

यांची निवड निश्चित
कसोटी मालिकेत दमदार प्रदर्शन करणारा अष्टपैलू रवींद्र जडेजाची निवड होणे निश्चित आहे. अमित मिश्रा दुसऱ्या फिरकीपटूची भूमिका पार पाडू शकतो. मनीष पांडे, केदार जाधव यांचेही संघातील स्थान निश्चित आहे.   

बुमराह, उमेशवर मदार
वेगवान गोलंदाजीत वेगवान गोलंदाज इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव हे त्रिकूट जबाबदारी पार पाडू शकते. मो. शमी आणि धवल कुलकर्णी दोघेही जखमी आहेत. हार्दिक पंड्यासुद्धा फिट झाला आहे.

सुरेश रैनाचे पुनरागमन शक्य
निवड समिती डावखुरा फलंदाज सुरेश रैनावर विश्वास ठेवते की नाही, हे पाहणे राेमांचक ठरेल. रैनाने आपला अखेरचा वनडे सामना ऑक्टोबर २०१५ मध्ये, तर अखेरचा टी-२० मार्च २०१६ मध्ये खेळला होता. 
बातम्या आणखी आहेत...