आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

थर्ड अंपायरचा निर्णय OUT येताच असा चेकाळला विराट, पाहा विनिंग मोमेंट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
थर्ड अंपायरने अंडरसनला बाद ठरवताच विराट कोहलीने हवेत उडी मारत हात वर नेला व विजयाचे सेलिब्रेशन सुरु केले. - Divya Marathi
थर्ड अंपायरने अंडरसनला बाद ठरवताच विराट कोहलीने हवेत उडी मारत हात वर नेला व विजयाचे सेलिब्रेशन सुरु केले.
स्पोर्ट्स डेस्क- विशाखापट्टणम येथील दुसरी कसोटी भारताने तब्बल 246 धावांनी जिंकून 5 कसोटीच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. राजकोटमध्ये झालेली पहिली कसोटी ड्रा झाली होती. आता आणखी तीन कसोटी सामने होतील. दुसरी कसोटी जिंकून भारताने या मालिकेत आघाडी घेतली आहे. त्यामुळे आज पाचव्या दिवशी शेवटची विकेट बाकी होती. त्याचवेळी जयंत यादवने जेम्स अंडरसनला पायचित पकडले.
मात्र, अंपायरने अंडरसनला नाबाद ठरवले. मग विराटने डीआरएस नियमानुसार, थर्ड अंपायरकडे दाद मागितली. थर्ड अंपायरने भारताच्या बाजूने निकाल अंडरसनला बाद ठरवले. त्यासोबत भारताने आपल्या कसोटी विजयावर शिक्कामोर्तब केले. यानंतर विराट कोहलीने हवेत उडी मारत हात वर नेला. संपूर्ण भारतीय संघाने जल्लोष केला. यावेळी विराट खूपच आनंदी व उत्साही दिसला. कारण त्याची ही 50 वी कसोटी होती. त्याची कामगिरीही सर्वात उजवी ठरली या कसोटीत. यामुळे या विजयानंतर त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला. असे करणारा तो तिसरा भारतीय क्रिकेटर बनला. याआधी सुनील गावसकर आणि हरभजन सिंग यांनी आपल्या 50 व्या कसोटी मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावला होता.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, टीम इंडियाचा तो विनिंग मोमेंट आणि विजयाच्या सेलिब्रेशनचे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...