आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेहवाग दिल्ली रणजी सोडणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा सुरू होण्यास अद्याप काही महिने शिल्लक असून खेळाडू राज्य बदलून खेळण्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. भारताचा स्टार फलंदाज वीरेंद्र सेहवाग दिल्ली सोडण्याच्या आणि वसीम जाफर विदर्भाकडून खेळण्याच्या हालचाली करत आहेत.

दिल्लीच्या फलंदाजीत त्याच्यासह गौतम गंभीर, मिथुन मन्हास आणि रजत भाटियासारख्या अनुभवी खेळाडूंमुळे युवा खेळाडूंना कमी प्रमाणात संधी मिळत आहे. आपल्या करिअरच्या याप्रसंगी युवा खेळाडूंना संधी देणे योग्य असल्याचे सेहवाग म्हणाला. सेहवागने २०१३-१४ च्या रणजी सत्रात आठ लढतींत ५१.६३ च्या सरासरीने ५६८ धावा काढल्या, ज्यात दोन शतकांचा समावेश होता. कर्णधार गंभीरपेक्षा केवळ एक धाव मागे होता, गंभीरच्या दिल्लीकडून सर्वाधिक धावा होत्या. सेहवागने दिल्लीला सोडले तर या रणजी संघाची मोठी हानी होऊ शकते.
बातम्या आणखी आहेत...