आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Virender Sehwags Coach AN Sharma Commented About Retirement

TOP-60 प्लेयर्समध्येही नव्हता सेहवाग, दोन सेंच्युरी फटकावल्या अन् झाले सिलेक्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ- वीरेंद्र सेहवागने मंगळवारी इंटरनॅशनल क्रिकेट आणि आयपीएलमधून निवृत्ती घेतली. सेहवागने आपल्या पत्रात आपल्या बालपणीचे कोच एएन. शर्मा यांचे विषेश आभार मानले. या विषयी आम्ही ए.एन. शर्मा यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. त्यांनी सेहवाग विषयी अनेक रंजक गोष्टी सांगील्या. त्याच्या बालपणीपासून ते आता पर्यंतच्या अनेक गोष्टी त्यांनी शेअर केल्या.
सिलेक्शन मॅचमध्येच फटकावल्या दोन सेंच्युरी
शर्माने यांनी सांगितले की, "दिल्लीच्या अंडर-19 टीममध्ये 60 संभावित प्लेयर्समध्ये सेहवागचे नाव नव्हते. ही गोष्ट जेव्हा मला समजली तेव्हा मी अतिशय निराश झालो. यानंतर मी डीडीसीएचे कन्वीनर सतीश शर्मा यांना सेहवाग चांगला खेळाडू आहे असे सांगितले. याला टीममध्ये असायला हवे. यावर ते म्हणाले मॅच खेळवा, मग बघू. वीरूने सिलेक्शन मॅचमध्येच सेंच्युरी फटकावली. या नंतर सतीश शर्मा यांनी आणखी एक मॅच खेळवायचे सांगितले सेहवागने त्याही सामन्यात सेंच्युरी फटकावली. यानंतर त्यांच्या कडे काही उत्तर नव्हते आणि सेहवागची अंडर-19 टीममध्ये डायरेक्ट एंट्री झाली होती.
'कोचपेक्षाही जास्त आहेत सेहवागशी नाते'
एएन शर्मा यांचे वय आज 71 वर्षांचे आहे. ते म्हणाले, "माझे आणि सेहवागचे नेहमीच बोलने होत असते. तो जेव्हाजेव्हा कॉल करतो तेव्हातेव्हा क्रिकेट शिवायहीदेखील चर्चा होत असतात. 20 ऑक्टोबरला त्याचा वाढदिवस होता. मी त्याला शुभेच्छाही दिल्या. आमचे नाते केवळ कोच आणि स्टूडेंट पुरतेच मर्यादित नाही. तो अगदी घरापासून ते प्रोफेशनल पर्यंत सर्व गोष्टींवर चर्चा करत असतो.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, कोच शर्मा यांनी वीरूबद्दल आणखी काय सांगितले....