आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Virender Sehwag\'s Younger Brother Name Is Vinod, Who Controls Family Business

हा आहे सेहवागचा लहान भाऊ व वहिणी, लाईमलाईटपासून दूर पण अशी आहे LIFE

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटोत (उजवीकडे) वीरेंद्र सेहवाग आणि त्याची पत्नी आरती. तर (डावीकडे) विनोद सेहवाग आणि त्याची पत्नी मीनाक्षी.... - Divya Marathi
फोटोत (उजवीकडे) वीरेंद्र सेहवाग आणि त्याची पत्नी आरती. तर (डावीकडे) विनोद सेहवाग आणि त्याची पत्नी मीनाक्षी....
स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागला दोन मोठ्या बहिणीसोबतच एक लहान भाऊ सुद्धा आहे. ज्याचे नाव विनोद सेहवाग आहे. हे दोघे भाऊ एकत्रच राहतात तसेच व्यवसायही एकत्रच करतात. वीरू विनोदपेक्षा फक्त 15 महिन्यानी मोठा आहे. मात्र दोघे एकाच वयाचे असल्याने त्यांच्यात चांगली मैत्री आहे. लहानपणी क्रिकेटसाठी दोघांत व्हायची भांडणे...
- काही दिवसापूर्वी दिलेल्या एका इंटरव्यूमध्ये विनोद म्हणाला, लहानपणी आमचा एक ग्रुप होता. त्याकाळी आम्ही खूपच मस्ती करायचो.
- या ग्रुपमध्ये वीरू आणि विनोदसह त्याचे दोन चुलत भाऊ जोगिंदर आणि कुणाल यांचाही समावेश होता.
- विनोदच्या म्हणण्यानुसार, मोठा असल्याने त्या काळीही वीरू आमच्यावर हुकमत गाजवायचा. तसेच प्रत्येक गोष्टीत तो पुढे असायचा.
- वीरू नेहमी विनोदला पहिल्यांदा बॅटिंग करायला सांगायचा व स्वत: बॉलिंग करायचा.
- विनोद सांगतो की, त्या काळी मी नेहमीच फसायचो. कारण वीरू मला लवकर बाद करायचा आणि तो नंतर निवांतपणे बॅटिंग करत आम्हाला चोपून काढायचा.
- वीरू बादच होत नसल्याचे पाहून कधी कधी विनोद वैतागून पळून जायचा तर वीरू त्याच्यावर चिडायचा.
- अशा वेळी दोघां भावांत एक डील व्हायची. ती अशी की, जर विनोद वीरूला बाद करू शकला नाही तर त्याने वीरूचा स्कूलचा होम वर्क पूर्ण करायचा.
- विनोद मजेने म्हणतो की, ही डील सुद्धा मला नेहमीच महागात पडायची. कारण वीरूचा स्कूलमधील होम वर्क नेहमीच अपूर्ण असायचा व तो मला पूर्ण करावा लागायचा.
आता व्यवसाय संभाळतो विनोद-
- विनोद सेहवाग हरियाणातील झज्जर येथे सुरु केलेल्या 'सेहवाग इंटरनॅशनल स्कूल' संभाळतो.
- वीरेंद्र जेव्हा क्रिकेट खेळत होता तेव्हापासून विनोद वेगवेगळे फॅमिली बिजनेस संभाळायचा. ज्यात सेहवाग इंटरनॅशनल स्कूलचा समावेश आहे.
- याशिवाय विनोद नवी दिल्लीस्थित सेहवाग क्रिकेट अकादमीचे काम पाहतो.
- तर फॅमिलीचे अनेक इतर बिजनेस आहेत ज्याचे मॅनेजमेंटचे काम विनोद आणि त्याची पत्नी मिळून पाहतात.
- विनोदच्या पत्नीचे नाव मीनाक्षी आहे. या जोडीला एक मुलगा, एक मुलगी आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे फोटोजमधून पाहा, कसे लाईफ जगतो वीरूचा लहाण भाऊ-वहिणी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...