आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गाण्याची अाेळ विसरल्याने वीरूने थांबवली मॅच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - तुम्ही असा क्रिकेटपटू पाहिला का, ज्याने गाण्याच्या अाेळी अाठवत नसल्याने कसाेटी सामना थांबवला . असा अफलातून प्रकार करणाऱ्या क्रिकेटपटूचे नाव वीरेंद्र सेहवाग अाहे. ही घटना २००८ मध्ये चेन्नईतील दक्षिण अाफ्रिकेविरुद्ध सामन्यादरम्यान घडली. सेहवाग हा गाेरेगाव येथे अायाेजित प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सत्राच्या उद््घाटन साेहळ्यात सहभागी झाला हाेता. या ठिकाणी त्याने अापल्या जीवनातील अनेक अाठवणींना मजेशीर पद्धतीने उजाळा दिला. यादरम्यान त्याने उपस्थितांना अनेक विनाेदी किस्से सांगून हसायला लावले.

‘मी ३०० च्या स्काेअरवर फलंदाजी करत हाेताे. गाणे गुणगुणत फलंदाजी करण्याची मला सवय हाेती. या वेळी मी ‘तू जाने ना’ हे गाणे गुणगुणत हाेताे. मात्र, मला या गाण्याच्या पुढील अाेळी अाठवतच नव्हत्या. त्या अाेळींचा मला विसर पडला. ड्रिंक्स ब्रेकच्या दरम्यान मी ईशांत शर्माला बाेलावले. ताे १२ वा खेळाडू हाेता. फील्डवर अाल्यावर त्याला माझ्या अायपाॅडवर गाणे एेकून मला पुढील अाेळी सांगण्याचे मी म्हणालाे. सर्वांना वाटले की, मी पाण्यासाठी त्याला बाेलावले. कधीकधी अशा प्रकारे १२ व्या खेळाडूचा वापर केला जाताे,’ असेही त्याने सांगितले.

या साेहळ्यादरम्यान त्याने पत्नीची तुलना पंचांशी केली. ‘मैदानावर ज्याप्रमाणे अापण पंचांशी वाद घालू शकत नाही त्याच प्रकारे अापण घरात पत्नीसाेबत कधीही वाद घालू शकत नाही. पंचांना एक वेळ विसर पडेल. मात्र, पत्नी अशा प्रकारच्या गाेष्टी कधीही विसरत नाही. त्यांना वादाचा विसर पडत नाही,’ असेही ताे म्हणाला. त्याने अापल्या क्रिकेट करिअरमध्ये अनेक वेळा पंचांचीही खिल्ली उडवली. ‘एक वेळ इंग्लंडचे अंपायर डेव्हिड शेफर्ड यांच्या पाेटाला हात लावला अाणि विचारले की कितवा महिना अाहे. शेफर्ड हे दिवसभर स्वत:शीच हसत राहिले,’ असेही त्याने अावर्जून सांगितले.

पुढे वाचा.... अख्तरसमाेर अाव्हान देणारे गाणे गात असे
बातम्या आणखी आहेत...