आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BCCI मध्ये सेटिंग नव्हती, त्यामुळे नाही होऊ शकलो हेड कोच; सेहवागचा धक्कादायक खूलासा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेहवागने एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की त्याचे सिलेक्शन हेड कोच म्हणून का नाही झाले. (संग्रहित फोटो) - Divya Marathi
सेहवागने एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की त्याचे सिलेक्शन हेड कोच म्हणून का नाही झाले. (संग्रहित फोटो)
 नवी दिल्ली- मैदानावर स्फाेटक फलंदाजी करणाऱ्या माजी क्रिकेटपटू वीरेेंद्र सेहवागने अापल्या सडेताेड वक्तव्याच्या शैलीने सध्या चांगलीच खळबळ उडवून दिले. बीसीसीअायच्या अातील व्यवहारावर त्याने चांगलीच टीका केली. ‘मंडळाच्या सचिवांमुळे मी प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला.   त्यानंतर कर्णधार विराट काेहलीसाेबतही बाेलणे झाले. मात्र, मला केवळ सेटिंग करणे जमले नाही. त्यामुळे मला भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी विराजमान हाेता अाले नाही, अशी परखड प्रतिक्रिया अाणि गाैप्यस्फाेट वीरेंद्र सेहवागने एका वाहिनीसाेबतच्या चर्चेदरम्यान केला.
 
यादरम्यान त्याने अनेक धक्कादायक असे खुलासेही केले. टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी अापण अर्ज केला हाेता. यासाठी मला बीसीसीअायचे सचिवांनी अाग्रह केला हाेता. मात्र, त्यानंतर अापली निवड झाली नाही. यादरम्यानच्या चांगल्या-वाईट अनुभवाचे त्याने कथन केले. ‘सचिव अमिताभ चाैधरी यांच्या अाग्रहास्तव मी प्रशिक्षक पदासाठी अर्ज केला हाेता. यासाठी काेहलीसाेबतही मी सखाेल चर्चा केली. मात्र, तरीही मला यातून डावलण्यात अाले,’ अशा शब्दांत त्याने अापला राेष व्यक्त केला.
 
कधी झाली होती शास्त्रीसोबत चर्चा
- सेहवागने सांगितले की, जूनमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान तो इंग्लंडमध्ये होता. तेव्हा शास्त्रीसोबत त्याने याबाबत चर्चा केली होती. जर मला शास्त्री हेड कोचच्या जागेसाठी अर्ज करणार आहे हे माहिती असते तर मी अर्ज केला नसता.
- रवी शास्त्री हेच कोचच्या पोस्टसाठी विराट कोहलीचे आवडते होते. 10 जुलैला कोचची घोषणा बीसीसीआयच्या सल्लागार समितीने करायची होती. त्याच्या काही दिवसापुर्वीच शास्त्री या पदासाठी उमेदवार झाले होते.
 
किती तास चालली सेहवाग यांची मुलाखत?
- 10 जुलै रोजी कोचची घोषणा क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य सौरव गांगुली, वीवीएस लक्ष्मण आणि सचिन तेंडुलकर हे करणार होते. दिवसभर मुंबईत या मुलाखतीची प्रक्रिया चालली. वीरेंद्र सेहवाग हा सुध्दा मुलाखतीसाठी आला होता. सेहवागचे प्रेझेन्टेशन सुमारे 2 तास चालले होते. तर रवी शास्त्री व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे यात सामील झाला होता.

का खास होता सेहवागचा अर्ज?
- सेहवागने BCCI ला केवळ 2 ओळींचा अर्ज केला होता. त्यात लिहिले होते की, त्यात त्याने आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबचा मेंटर असल्याचे सांगितले होते आणि त्यांच्यासोबत यापूर्वीही खेळलो असल्याचे सांगितले.
 
नावाच्या घोषणेस उशीर का?
- सौरव गांगुलीने पत्रकार परिषदेत सांगितले होते की, कोचच्या नावाची घोषणा आताच करण्यात येणार नाही. त्यासाठी घाई करण्यात येणार नाही. कोहलीबरोबर चर्चा करण्यात आल्यानंतरच निर्णय घेण्यात येईल.
- सुप्रीम कोर्टने गठित केलेल्या CoA ने यात हस्तक्षेप केल्यानंतर संध्याकाळी नावाची घोषणा करण्यात आली. रवी शास्त्रीला हेड कोच म्हणून नियुक्त करण्यात आले. 
 
पुढील स्लाईडवर वाचा कोणाचा दावा होता मजबुत, केव्हा झाला ड्रामा
बातम्या आणखी आहेत...