आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • VVS Laxman’s 281 Runs Inning Against Australia At The Eden Garden The Best Test Innings In Last 50 Years

ही ठरली 50 वर्षातील \'व्हेरी व्हेरी स्पेशल\' इनिंग, लक्ष्मणने केल्या होत्या 281 धावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्ही.व्ही. एस. लक्ष्मण. - Divya Marathi
व्ही.व्ही. एस. लक्ष्मण.
नवी दिल्ली- व्हीव्हीएस लक्ष्मणने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2001 मध्ये केलेली 281 धावांची खेळी ही मागील 50 वर्षांच्या कसोटी इतिहासातील सर्वोत्तम खेळी म्हणून गणण्यात आली. ईएसपीएनने मतदानाच्या आधारे त्यांच्या 'क्रिकेट मंथली' या डिजिटल मॅगझीनच्या जानेवारी महिण्यातील अंकात 50 सर्वोत्कृष्ट कसोटी परफॉर्मर्सची निवड केली. यात लक्ष्मण पहिल्या स्थानावर आहे.
पाठदुखीने त्रस्त होता लक्ष्मण, तरी मिळवून दिला भारताला विजय...
- साधारणपणे 15 वर्षांपूर्वी इडन गार्डनवर झालेल्या एका कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारत 274 धावांनी पिछाडीवर होता. तेव्हा लक्ष्मणने ही खेळी खेळली होती आणि भारताने सामना जिंकला होता.

- लक्ष्मणच्या या 281 धावांच्या खेळीणे ऑस्ट्रेलियाचा सलग 16 विजयांचा अश्वमेध रोखला होता.

- त्याने या सामन्यात राहुल द्रविडसह (180) 376 धावांची भागिदारी केली होती.

- तेव्हा लक्ष्मणचा रूम पार्टनर असलेल्या जहीर खानने सांगितले होते की, "लक्ष्मणला पाठदुखीचा फार त्रास होता. तो फर्शीवरच झोपायचा. त्यामुळे त्याच्या या खेळीचे मोठे महत्व आहे."
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, कुंबळे, द्रविड, कपिल देवसह आणखी कोण भारतीय आहेत या यादीत....