आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वानखेडेच्या ‘जोड नामकरणासाठी’ चुरस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मार्केटिंगच्या युगात आता क्रिकेट स्टेडियमदेखील मागे राहिली नाहीत. क्रिकेटपटूंनी लोकप्रिय केलेल्या या जागांवर कल्पक पद्धतीने जाहिराती दाखविल्यास आपला फायदा होऊ शकतो, हे अनेक उद्योजकांना कळले आहे. अशाच कंपन्यांपैकी काही कंपन्यांनी आज वानखेडे स्टेडियमवरील जाहिरातींचा आपल्या कल्पक योजना मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीमुळे सादर केल्या. त्यामध्ये आयएमजी रिलायन्स, डीव्हिएम मुद्रा, बेसलाइन या कंपन्या होत्या. या कंपन्यांनी आपण स्टेडियमवर कुठे व कशा पद्धतीने जाहिराती करू, याचे चित्रीकरण संगणकाद्वारे सादर केले. क्रिकेट सामने व आयपीएलसारख्या स्पर्धांच्या वेळी हक्कधारकांशीही आपण बोलणी करू व मार्ग काढू, असेही या कंपन्यांनी आश्वासन दिले आहे. मोबदल्यात मुंबई क्रिकेट असोसिएशनला कोट्यवधी रुपये देण्याची तयारी या कंपन्यांनी दर्शविली आहे. बदल्यात वानखेडे स्टेडियमशी त्यांचे नावही जोडण्यात येणार आहे.

इंग्लंडच्या क्रिकेट संघटनेने, ओव्हल मँचेस्टर किंवा अन्य स्टेडियमवर जशा जाहिराती करण्यास परवानगी दिली, त्याच धर्तीवर स्टेडियमचे नामकरणही करण्याचा प्रस्ताव आहे.

वानखेडे स्टेडियमची वास्तू दक्षिण मुंबईत असल्यामुळे व्यावसायिकदृष्ट्या त्याचा लाभ जाहिरातदारांना होऊ शकतो. त्यामुळे काही जाहिरात कंपन्यांनीही आपल्या प्रमुख “क्लायंट’साठी वानखेडे स्टेडियमच्या वास्तूचा विचार केला आहे, असे कळते. त्यासाठी “टेंडर्स’ मागविण्यात आली आहेत. सर्वोत्तम योजना आणि अधिक निधी देणाऱ्या कंपनीची निवड करण्यात येईल. मात्र, सध्या ही कल्पना प्राथमिक स्वरूपात आहे.
बातम्या आणखी आहेत...