आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Warnes Warriors Won Series Against Sachin Blasters

वार्नच्या षटकाराने जिंकले वॉरियर्स, सचिनच्या संघाचा 3-0 ने पराभव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सामना संपल्यानंतर सेल्फी घेताना शोएब अख्तर. - Divya Marathi
सामना संपल्यानंतर सेल्फी घेताना शोएब अख्तर.
लॉस एंजल्स - क्रिकेट ऑल स्टार्सच्या तिसऱ्या सामन्यात शेन वार्नच्या षटकाराने वॉर्न्स वॉरियर्सने सचिन्स ब्लास्टर्सला 4 विकेटने पराभूत केले. त्यामुळे मालिकेच सचिनच्या नेतृत्त्वातील ब्लास्टर्स 3-0 ने पराभूत झाले. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये वॉर्न्स वॉरियर्स जिंकले होते. या सामन्यात सचिनच्या टीमने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांमध्ये 219 धावा केल्या होत्या. वॉर्न्सच्या टीमने अखेरच्या चेंडूवर षटकार खेचत सामन्यात विजय मिळवला.

18व्या आणि 19व्या ओव्हरमध्ये बदलली स्थिती
सचिनचा संघ विजयी होणार असे वाटत असतानाच 18व्या आणि 19व्या ओव्हरमध्ये सामन्याची स्थिती पलटली. 18 व्या ओव्हरमध्ये 26 आणि 19 व्या ओव्हरमध्ये 23 धावा काढल्या. त्यामुळे त्यांना विजयासाठी अखेरच्या 20 व्या ओव्हरमध्ये केवळ 8 रन हवे होते. पाँटिंग आणि वॉर्न यांनी ते सहज पूर्ण केले.

सचिन्स ब्लास्टर्सच्या 219 धावा
सचिन तेंडुलकर (56) आणि सौरव गांगुली (50) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर सचिन ब्लास्टर्सच्या संघाने वार्न्स वॉरियर्ससमोर 220 धावांचे आव्हान ठेवले. सचिनने 27 चेंडूंमध्ये 2 चौकार आणि षटकार खेचले. तर गांगुलीने 37 चेंडूंमध्ये 3 चौकार आणि ३ षटकार लगावले. डॅनियल व्हिट्टोरीने ३ विकेट घेतल्या. तर वॉल्श आणि सायमंड्स यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. वेटरन क्रिकेटर्सच्या ऑल स्टार्स सिरीजचा तिसरा सामना लॉस एंजल्समध्ये झाला.

तडाखेबाज फलंदाजी
कर्णधार सचिन तेंडुलकरने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सचिन्स ब्लास्टर्सने तडाखेबाज सुरुवात केली. विशेषतः सचिन तेंडुलकरच्या फटकेबाजीच्या जोरावर ब्लास्टर्सने 3 ओव्हरमध्येच 50 धावा पूर्ण केल्या. त्याच दरम्यान सेहवागच्या रुपाने भारताला पहिला धक्का बसला. वॉल्शने त्याची विकेट घेतली. सेहवागने 15 बॉलमध्ये 3 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 27 धावा केल्या.

सचिनचे वादळी अर्धशतक
सेहवाग बाद झाल्यानंतर सचिनने तुफानी फलंदाजी केली. त्याने 25 चेंडूंमध्ये 5 सिक्स आणि एक चौकार मारून अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर व्हिट्टोरीच्या चेंडूवर षटकार लगावला. पुढच्या चेंडूवरही षटकार खेचायचा प्रयत्न केला. पण तो फसला. आणि संगकाराने त्याला यष्टीचित केले.

खराब सुरुवात
220 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या वॉरियर्सची सुरुवात फारसी चांगली झाली नाही. मायकल वॉ शून्यावर बाद झाला. सायमंड्स आणि हेडनने दुसऱ्या विकेटसाठी 50 धावा जोडल्या. साइमंड्सला स्वानने बाद केले. हेडन. जाँटी यांनाही पारशी चांगली कामगिरी करता आली नाही.

कॅलिस-संगकारा-पाँटिंगची विजयी खेळी
त्यानंतर संगकारा आणि पाँटिंगने ब्लास्टर्सच्या गोलंदाजांची धुलाई केली. संगकाराने 21 चेंडूत 42 तर पाँटिंगने 25 चेंडूत 43 धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेच्या कॅलिसने 23 चेंडूंमध्ये 4 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 47 धावा केल्या. त्यांनी संपूर्ण स्थिती बदलून टाकली. अँब्रोस, हूपर आणि सेहवागने प्रत्येक एक विकेट घेतली.

पुढील स्लाइड्सवर पाहा, PHOTOS