आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताविरूद्धच्या चार कसोटी मालिकेसाठी WIचा संघ जाहीर, होल्डरकडे नेतृत्त्व

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डने भारताविरोधात चार कसोटी सामन्याच्या मालिकेसाठी मंगळवारी संघ जाहीर केला. 12 सदस्यांच्या या टीमचे नेतृत्त्व जेसन होल्डर करेल. - Divya Marathi
वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डने भारताविरोधात चार कसोटी सामन्याच्या मालिकेसाठी मंगळवारी संघ जाहीर केला. 12 सदस्यांच्या या टीमचे नेतृत्त्व जेसन होल्डर करेल.
सेंट किट्स- वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डने भारताविरोधात चार कसोटी सामन्याच्या मालिकेसाठी मंगळवारी संघ जाहीर केला. 12 सदस्यांच्या या टीमचे नेतृत्त्व जेसन होल्डर करेल. कोण-कोण आहे संघात...
- स्थानिक क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करणारा अष्टपैलू खेळाडू रोस्टन चेसला कॅरेबियन संघात स्थान दिले गेले आहे.
- दुसरीकडे, जानेवारीत शेवटची कसोटी खेळलेला लियोन जॉनसनला पुन्हा संधी दिली गेली आहे.
- सराव सामन्यात भारताविरोधात नाबाद शतक झळकवलेल्या शाही होपला सध्या तरी संघात स्थान मिळाले नाही.
- वेस्ट इंडिज संघात गोलंदाजीची जबाबदारी शेनॉन गेब्रिएल, कार्लोस ब्रेथवेट, जेसन होल्डर आणि लेग स्पिनर देवेंद्र बिशू यांच्यावर असेल.
- पहिली कसोटी 21 जुलैपासून सुरु होत आहे.
असा आहे वेस्ट इंडिजचा संघ- जेसन होल्डर (कर्णधार), क्रेग ब्रेथवेट (उपकर्णधार), देवेंद्र बिशू, जरमॅन ब्लॅकवूड, कार्लोस ब्रेथवेट, डॅरेन ब्रावो, राजेंद्र चंद्रिका, रॉस्टन चेस, शेन डॉरिक (विकेटकीपर), शेनन गेब्रिएल, लियोन जॉनसन आणि मार्लोन सॅम्युअल्स.
अशी होईल कसोटी मालिका-

पहिली कसोटी- 21 जुलै ते 25 जुलै, एंटिगुआ
दूसरी कसोटी- 30 जुलै ते 3 ऑगस्ट, जमैका
तिसरी कसोटी- 9 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट, सेंट लुसिया
चौथी कसोटी- 18 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट, क्वीन्स पार्क ओवल
वेस्ट इंडिज दौ-यासाठी असा आहे भारतीय संघ-
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मुरली विजय, शिखर धवन, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, रिद्धिमान साहा, आर. अश्विन, अमित मिश्रा, रवींद्र जडेजा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, शार्दुल ठाकुर, स्टुअर्ट बिन्नी.
पहिला सराव सामना अनिर्णित-
- शाई होप (नाबाद 118)च्या शानदार खेळीच्या बळावर वेस्ट इंडीज अध्यक्षीय संघाने भारताविरुद्ध ड्रॉ झालेल्या दोनदिवसीय सामन्याच्या अखेरच्या दिवशी 7 बाद 281 धावा काढल्या.
- भारताकडून गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. लेगस्पिनर अमित मिश्राने शानदार कामगिरी करताना 67 धावांत 4 गडी बाद केले, तर भुवनेश्वर कुमार, मोहंमद शमी, उमेश यादव यांनी प्रत्येकी विकेट घेतली.

- दुसऱ्या दिवशी वेस्ट इंडीजकडून होपशिवाय राजेंद्र चंद्रिकाने 69 धावांची खेळी केली. त्याने होपसोबत दुसऱ्या विकेटसाठी 122 धावांची भागीदारी केली. वॉरिकनने नाबाद 50 धावांचे योगदान दिले.
- होप आणि वॉरिकन यांनी आठव्या विकेटसाठी 104 धावांची शतकी भागीदारी करून संघाचा डाव सावरत स्कोअर 281 धावांपर्यंत पोहोचवला.
- तत्पूर्वी भारताकडून शिखर धवन (51), लोकेश राहुल (50) रोहित शर्मा (नाबाद 54) यांनी अर्धशतके ठोकली. या तिघांच्या अर्धशतकाच्या बळावर भारताने वेस्ट इंडीज अध्यक्षीय संघाविरुद्ध पहिल्या दिवसअखेर 6 बाद 258 धावा काढल्या होत्या.
पुढे वाचा, अमित मिश्रा अनिल कुंबळेंबाबत काय म्हणाला...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...