आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवराज-हेजलच्या रिसेप्शनमध्ये धोनी-सेहवाग आणि जेटली, सुब्रत रॉयही होते उपस्थित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - दिल्लीमधील फाइव्ह स्टार हॉटेल आयटीसी मौर्य शेरेटनमध्ये झालेल्या युवराज सिंग आणि हेजल कीच यांच्या लग्नाच्या रिसेप्शन सोहळ्याला क्रिकेटपटुंसह विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. टीम इंडियाचा वन डे कर्णधार महेंद्र सिंह धोनी, वीरेंद्र सेहवाग, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, ऊर्जा मंत्री पीयूष गोयल यांच्यासह सहाराचे प्रमुख सुब्रतो रॉयही याठिकाणी पोहोचले होते. सोमवार दिल्लीमध्येच युवी आणि हेजलच्या पोस्ट वेडिंग संगीत सेरेमनीचे आयोजन करण्यात आले होते. युवराज-हेजल यांचा विवाह पंजाबच्या गुरुद्वाऱ्यांच 30 नोव्हेंबरला झाला होता. त्यानंतर 2 डिसेंबरला गोव्यात हिंदु पद्धतीने लग्न झाले होते.
कपिल देवचीही उपस्थिती...
- दिल्लीच्या फाइव्ह स्टार आईटीसी मौर्य हॉटेलमध्ये सर्वात आधी पोहोचले क्रिकेट लेजंड कपिल देव.
- कपिलनंतर टीम इंडियातील कसोटी संघात समावेश झालेला पार्थिव पटेल सोहळ्यात उपस्थित झाला होता.
- चाहते सर्वाधिक वाट पाहत असलेला वनडे टीमचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी रात्री उशीरा सोहळ्यात आला होता. त्यावेळी पत्नी साक्षीही त्याच्याबरोबर होती.
- त्याशिवाय बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि माजी क्रिकेटपटू सौरभ गांगुली यांच्यासह झहीर खान, मोहम्मद कैफ यांचीही रिसेप्शनमध्ये उपस्थिती होती.
पुढील स्लाइड्सवर पाहा, युवराजच्या रिसेप्शनचे PHOTOS
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...