आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इरफानचा हरभजनला धक्का; सय्यद मुश्ताक अली ट्राॅफी टी-20 मध्‍ये पश्चिम विभागाचा विजय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - इरफान पठाण (३/१०) अाणि पार्थिव पटेलच्या (५६) शानदार कामगिरीच्या बळावर पश्चिम विभागाने साेमवारी सय्यद मुश्ताक अली ट्राॅफी टी-२० क्रिकेट स्पर्धेत शानदार विजय संपादन केला. पश्चिम विभागाने सामन्यात हरभजन सिंगच्या उत्तर विभागावर ८ गड्यांनी मात केली. प्रथम फलंदाजी करताना उत्तर विभागाने ८ बाद १०७ धावा काढल्या. प्रत्युत्तरात पश्चिम विभागाने १२.४ षटकांत २ गड्यांच्या माेबदल्यात लक्ष्य गाठले. कर्णधार पार्थिव पटेल, अादित्य अाणि अाैरंगाबादच्या अंकित बावणेने धडाकेबाज खेळी करताना पश्चिम विभागाला विजय मिळवून दिला. अंकित बावणेने नाबाद ४ धावांचे याेगदान दिले.   

धावांचा पाठलाग करणाऱ्या पश्चिम विभागाकडून श्रेयस अय्यर (३०) अाणि पार्थिव पटेल (५६) यांनी अर्धशतकी भागीदारीची सलामी दिली. त्यानंतर अादित्य तरेने नाबाद १४, अंकित बावणेने नाबाद ४ धावांची खेळी करून पश्चिम विभागाने सामना जिंकला. तत्पूर्वी, उत्तर विभागाच्या गाैतम गंभीरने (६०) केलेली खेळी व्यर्थ ठरली. स्फाेटक फलंदाज युवराज सिंग सामन्यात भाेपळाही फाेडू शकला नाही. कर्णधार हरभजन सिंगने ७ धावांची खेळी केली.   

इरफानचे तीन बळी : पश्चिम विभागाच्या इरफान पठाणने धारदार गाेलंदाजी केली. त्याने सामन्यात ३ बळी घेतले. शार्दूल ठाकूर, ईश्वर चाैधरी अाणि अभिषेक नायरने सामन्यात प्रत्येकी एक विकेट घेतली.
 
पूर्व विभागाचा विजय  
मनाेज तिवारीच्या नेतृत्वात पूर्व विभागाने सय्यद मुश्ताक अली ट्राॅफी टी-२० क्रिकेट स्पर्धेत सामना जिंकला. पूर्व विभागाने सामन्यात मध्य विभागावर ७ गड्यांनी मात केली. प्रथम फलंदाजी करताना मध्य विभागाने ७ बाद १५१ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात पूर्व विभागाने १७.१ षटकांत ३ गड्यांच्या माेबदल्यात लक्ष्य गाठले. ईशान किशन (६७) अाणि ईश्वर जग्गीने (नाबाद ५१) शानदार अर्धशतक ठाेकून संघाला झटपट विजय मिळवून दिला.
बातम्या आणखी आहेत...