स्पोर्ट्स डेस्क- वेस्ट इंडिजचे टॉप क्रिकेटर्स ख्रिस गेल आणि ड्वेन ब्राव्हो सध्या भारतात आहेत. हे दोघे कंडोम कंपनी 'स्कोर' चे ब्रॅंड अॅम्बेसेडर आहेत आणि यासाठीच ते कंपनीच्या अॅड शूटसाठी मुंबईत आला आहे. नुकतेच दोघांनी कंपनीच्या एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये सहभाग घेताना न्यू प्रॉडक्ट लॉन्च केले तसेच ही नवी अॅड शूट केली. ख्रिस गेलने महिला अॅंकरपासून अंतर राखले...
- ख्रिस गेलवर नेहमीच महिला रिपोर्टर्स आणि अॅंकर यांच्यावर अश्लिल कमेंट्स केल्याचा आरोप लागले आहेत.
- या आरोपांमुळेच ख्रिस गेल या इव्हेंटदरम्यान महिला होस्टसोबत अतिशय नम्रतापूर्वक वागत होता.
- प्रोग्रामदरम्यान त्याने होस्टला हात जोडून नमस्कार घातला व सुरक्षित अंतर ठेवले.
- मागील वर्षी ऑस्ट्रेलियातील बिग बॅशदरम्यान त्याने महिला पत्रकारासोबत मुलाखत देताना अश्लिल भाष्य केले होते.
- यानंतर इंडिज टीम व्यवस्थापनातील महिला सहकारीने गेलबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले होते.
- कदाचित याचमुळे कोणत्याही वादात अडकण्यापेक्षा व
आपली प्रतिमा सुधारण्यासाठी गेलने यावेळी काळजी घेतल्याचे दिसून आले.
- ख्रिस गेलसोबतच वेस्ट इंडीजचा एक और स्टार प्लेयर ड्वेन ब्राव्हो सुद्धा या कंडोम कंपनीचा ब्रॅंड अॅम्बेसेडर आहे.
- दरम्यान, ख्रिस गेल आपल्या या इंडिया टूरमध्ये दिल्लीत आपले बुक 'सिक्स मशीन'चे प्रकाशन करणार आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे फोटोजमधून पाहा, प्रॉडक्ट लॉन्चिंगदरम्यान गेल आणि ब्राव्होची मस्ती...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)