आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गेलचा खेल इंग्लंड फेल : वेस्ट इंडीजची इंग्लंडवर ६ विकेटने मात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - फक्त गेलचा खेल...बाकी सब फेल...असे काहीसे इंग्लंड-वेस्ट इंडीज टी-२० सामन्यात घडले. वर्ल्डकपच्या या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १८२ धावांचा मजबूत स्कोअर उभा केला. मात्र, एकट्या गेलने हा स्कोअर खुजा ठरवला. गेलने दे दणादण चौकार, षटकारांची आतषबाजी करताना नाबाद १०० धावा ठोकल्या. त्याच्या खेळीमुळे वेस्ट इंडीज टीमने ११ चेंडू आणि ६ विकेट शिल्लक ठेवून विजय मिळवला.

गेलने अवघ्या ४८ चेंडूंत ५ चौकार आणि ११ उत्तुंग षटकार खेचून नाबाद १०० धावा ठोकल्या. गेलच्या खेळीने इंग्लंडच्या गोलंदाजांच्या नाकी नऊ आणले. गेलशिवाय सॅम्युअल्सने ३७ आणि आंद्रे रसेलने नाबाद १६ धावा काढल्या. तत्पूर्वी, इंग्लंडने १८२ धावांचा मजबूत स्कोअर उभा केला. कर्णधार मॉर्गनने मात्र १४ चेंडूंत २८ धावा फटकावताना आक्रमकता दाखवली. मात्र, हेल्स (२६ चेंडूंत २८ धावा), बटलर (२० चेंडूंत ३० धावा) आणि जो. रुट (३६ चेंडूंत ४८ धावा) यांना मोठे डाव उभारण्यात अपयश आले. इंग्लंडने ठणठणीत खेळपट्टीचा लाभ उठवला असता तर त्यांना कदाचित द्विशतकी मजलही मारता आली असती. रुटने आपल्या ४८ धावांच्या खेळीत तीन चौकार आणि दोन षटकार खेचले. इंग्लंडच्या ११४ धावा झाल्या असताना रुट बाद झाला. त्यानंतर आलेल्या जॉर्ज बटलरने २० चेंडूंमध्ये ३० धावा काढताना तीन उत्तुंग षटकार ठोकले. आंद्रे रसेल आणि ड्वेन ब्राव्हो यांनी प्रत्येकी दोन बळी घेऊन इंग्लंडला १८२ धावांमध्ये अडवले. मोर्गनने नाबाद २७ आणि बेन स्टोक्सने १५ धावा काढल्या. वेस्ट इंडीजकडून आंद्रे रसेलने ३६ धावांत २ आणि ब्राव्होने ४१ धावांत २ गडी बाद केले.
दवबिंदूंनी केला घात
वानखेडे स्टेडियमवर बुधवारी नेहमीपेक्षा अधिक दव पडल्याचे जाणवले. हा फरक कशामुळे पडला याचे उत्तर इंग्लिश संघ शोधत आहे. दव पडू नये यासाठी वापरण्यात येणाऱ्या ३० रसायनांचा या वेळी नेमका का परिणाम झाला नाही? ती रसायने खूपच जुनी असल्यामुळे त्यांचा परिणाम व्हावा तसा झाला नाही. त्यामुळे गोलंदाजांना चेंडूवर पकड नीट बसवता येत नव्हती.
गेलचा विश्वविक्रम
विंडीजचा स्फाेटक फलंदाज क्रिस गेलने विश्वविक्रमाला गवसणी घातली. त्याने अांतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात सर्वाधिक षटकारांचा नवा विश्वविक्रम अापल्या नावे केला. अाता ताे ९८ षटकारांसह अव्वल स्थानावर अाहे. त्याने बुधवारी इंग्लंडविरुद्ध सामन्यात ११ षटकार ठाेकून हा विक्रम अापल्या नावे केला.
गेलचे वादळ
> १००* धावा
> ४८ चेंडू
> ०५ चौकार
> ११ षटकार
> २०८.३३ स्ट्राइक रेट
पुढील स्‍लाइड्सवर पाहा,धावफलक आणि वाचा रंजक माहिती...
बातम्या आणखी आहेत...