आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विंडीज क्रिकेट मंडळाने दिला क्रिकेटपटूंना अल्टिमेटम!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किंग्जस्टन - येत्या रविवारपर्यंत करारावर स्वाक्षरी न केल्यास टीममधून खेळाडूंची हकालपट्टी करण्यात येईल, अशी धमकी वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळाने खेळाडूंना दिली अाहे. तसेच चार दिवसांचा अल्टिमेटमही दिला अाहे. त्यामुळेच भारतात हाेणाऱ्या अागामी टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या ताेंडावरच विंडीज क्रिकेट मंडळ अाणि खेळाडूंमधील वाद चव्हाट्यावर अाला अाहे. मंडळाच्या दबावावर नाराज असलेल्या १५ सदस्यीय टीमने प्रस्तावित करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला अाहे. ‘काेणत्याही परिस्थितीमध्ये वेस्ट इंडीज टीम विश्वचषकात सहभागी हाेणार अाहे. करारावर स्वाक्षरी केल्याशिवाय संघ रवाना हाेत नाही. खेळाडूंनी यावर स्वाक्षरी केली नाही तर अाम्ही नवीन खेळाडूंना संधी देऊ,’ अशी धमकीही मंडळाचे सीईओ मायकेल मुइरहेड यांनी दिली.