आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • West Indies\' Darren Sammy Ready To Slay \'Goliath\' And Beat \'a Billion\' Indians

पराभवानंतर या पॅरा क्रिकेटरकडे पाहून प्रोत्साहित झाला विराट, म्हणाला- आयुष्य तर संपले नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विराटकोहलीची आता टी-20 मध्ये सर्वाधिक 16 अर्ध शतके झाली आहेत. - Divya Marathi
विराटकोहलीची आता टी-20 मध्ये सर्वाधिक 16 अर्ध शतके झाली आहेत.
मुंबई - सेमीफायनलमध्ये वेस्ट इंडीजकडून पराभूत झाल्यानंतर विराटने प्रथमच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शुक्रवारी त्याने ट्विट करुन तो आशावादी असल्याचे आणि पराभवाने दुसऱ्यांनीही खचून जावू नये असा संदेश दिला आहे. तो म्हणाला,'आशा कधी सोडू नये, कारण आयुष्य कधी संपत नाही. ही तर फक्त सुरुवात आहे.' त्यासोबत त्याने ट्विटरवर पॅरा क्रिकेटर आमिर हुसैन लोनचा व्हिडिओ शेअर केला आहे. टी-20 वर्ल्डकपमध्ये विराटची खेळी बहारदार राहिलेली आहे.

विराटने कोणत्या दिव्यांग क्रिकेटरचा उल्लेख केला
- आमिर हुसैन लोन याला दोन्ही हात नाहीत, मात्र तो क्रिकेट खेळतो.
- जम्मू-काश्मीरच्या पॅरा क्रिकेट टीमचा तो कॅप्टन आहे.
- आमिर मास्टर-ब्लास्टर सचिन तंडुलकरचा फार मोठा चाहता आहे.
- आमिरचे लहानपणापासून क्रिकेटर होण्याचे स्वप्न होते. मात्र बिजबेहडा येथील त्याच्या वडिलांच्या बॅट तयार करण्याच्या कारखान्यात झालेल्या दूर्घटनेत त्याचे दोन्ही हात कापले गेले.
- आता दोन्ही हात नसताना तो मानेने बॅट पकडतो आणि पायांनी बॉलिंग करतो.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, गेलचा Champion Dance
>> मॅच पाहाण्यासाठी सचिनसोबत आदित्य ठाकरे वानखेडेवर