आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

WI Vs IND: चौथ्या कसोटीतील दुस-या दिवशीही पावसाची बाधा, इंडिज 2 बाद 62

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इशांत शर्माने सलामीवीर जॉन्सनला पुन्हा एकदा लवकर टिपले. - Divya Marathi
इशांत शर्माने सलामीवीर जॉन्सनला पुन्हा एकदा लवकर टिपले.
पोर्ट ऑफ स्पेन- भारत- विंडीज चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवसाचा बराचसा वेळ पावसाने वाया घालवला. तर दुस-या दिवशी एकही चेंडू फेकला गेला नाही. विंडीजने 2 गडी गमावून 62 धावा केलेल्या असताना पावसामुळे खेळ थांबवावा लागला. जेव्हा खेळ थांबला तेव्हा विंडीजचा क्रेग ब्रेथवेट नाबाद 32 धावांवर, तर मार्लन सॅम्युअल्स 4 धावांवर नाबाद खेळत होते. ईशांत शर्मा आणि अश्विनने प्रत्येकी एक बळी घेतले.
नाणेफेक जिंकून विंडीजने फलंदाजी स्वीकारली. ब्रेथवेट जॉन्सनने पहिल्या गड्यासाठी 31 धावांची सावध भागीदारी केली. मात्र, ईशांतने जॉन्सनला (9) बाद केले. त्यानंतर डॅरेन ब्राव्होला (10) अश्विनने जाळ्यात अडकवले. ब्रेथवेटने 32 धावा करत विंडीजचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, खेळपट्टी गोलंदाजांना साथ देणार असल्याचे लक्षात घेऊन विराट कोहलीने संघात दोन बदल केले. शिखर धवनला बाहेर काढत मुरली विजयला संधी दिली तर जडेजाऐवजी चेतेश्वर पुजाराला संधी दिली गेली. इंडिज संघात अल्झारी जोसेफऐवजी लेगस्पीनगर देवेंद्र बिशूला संधी दिली आहे. चार कसोटी सामन्याच्या मालिकेत 2-0 असा पुढे आहे.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, चौथ्या कसोटीतील पहिल्या दिवशी नेमके काय काय घडले....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...