आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विंडीजविरुद्ध इंग्लंड मालिकेत 2-0 ने पुढे, दुसऱ्या वनडेत विंडीजवर 4 गड्यांनी केली मात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अँटिगुवा - ज्याे रुट (नाबाद ९०), क्रिस वाेक्स (नाबाद ६८) अाणि जेसन राॅय (५२) यांच्या झंझावाताच्या बळावर इंग्लंडने दुसऱ्या वनडेत वेस्ट इंडीजचा ४ गड्यांनी पराभव केला. इंग्लंडने तीन वनडे सामन्यांच्या मालिकेमध्ये २-० ने विजयी अाघाडी मिळवली. अाता मालिकेतील शेवटचा अाणि तिसरा वनडे गुरुवारी रंगणार अाहे.  
 
वेस्ट इंडीजने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद २२५ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात इंग्लंडने ४८.२ षटकात ६ गड्यांच्या माेबदल्यात लक्ष्य गाठले.  
 
इंग्लंडची निराशाजनक सुरुवात झाली. सलामीवीर बिलिंग्स   भाेपळा न फाेडताच तंबूत परतला. त्यानंतर  ज्याे रुटने  डाव सावरला. त्याने सलामीच्या राॅयसाेबत दुसऱ्या गड्यासाठी ८६ धावांची भागीदारी करून विजयाचा मजबूत पाया रचला. रुट, वोक्सच्या अर्धशतकाने सामना फिरवला.
 
रुट-वाेक्सची भागीदारी
ज्याे रुट अाणि वाेक्सने शतकी भागीदारी रचून इंग्लंडला विजय मिळवून दिला. त्यांनी  सातव्या विकेटसाठी अभेद्य १०२ धावांची भागीदारी केली.  रुटने १२७ चेंडूंत ३ चाैकारांच्या अाधारे नाबाद ९० धावा काढल्या.  वाेक्सने ८३ चेंडूंमध्ये ५ चाैकार व २ षटकारांसह नाबाद ६८ धावांची खेळी केली.   
बातम्या आणखी आहेत...