आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • West Indies Team Celebration After Winning T20 World Cup

WC जिंकल्यानंतर वेस्ट इंडीजने 'सलमान खान' स्टाइल डान्स करत असा केला जल्लोष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्वप्रथम क्रिस गेलने मैदानात टी-शर्ट उतरवून जल्लोषाला सुरुवात केली. - Divya Marathi
सर्वप्रथम क्रिस गेलने मैदानात टी-शर्ट उतरवून जल्लोषाला सुरुवात केली.
कोलकाता - वेस्ट इंडिज एका दिवसात दोनवेळा वर्ल्डचॅम्पियन ठरले आहे. प्रथम वूमन्स टीमने ऑस्ट्रेलियाला 8 विकेटने पराभूत केले, त्यानंतर मेन्स टीमने इंग्लंडला 4 विकेटने पराभवाची धूळ चारली आणि दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्डकप चॅम्पियन झाले. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत 9 विकेट गमावत 155 रन्स केले. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजने 19 ओव्हरपर्यंत पराभवाच्या छायेत होते, मात्र अचानक ब्रॅथवेटने एका पाठोपाठ एक चार षट्कार लगावत सामन्याचा नूर पालाटला. फक्त तीन मिनिटांमध्ये सामना पलटला. शेवटच्या 6 बॉलमध्ये विजयासाठीचे 19 रन्स घेतले. हे अतिशय कठीण होते, मात्र ब्रॅथवेटने शेवटच्या ओव्हरमध्ये पहिल्या चार बॉलमध्ये सलग चार षटकार लगाव टीमला Unbelievable विजय मिळवून दिला. टीमच्या विजयाचा जल्लोष संपूर्ण कॅरेबियन टीमने टी-शर्ट उतरवून 'चॅम्पियन डान्स' करुन केला. त्यांच्या टी-शर्ट उतरवून डान्स करण्याच्या स्टाइलला सलमान खान डान्स म्हटले जाऊ लागले आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, वेस्ट इंडिज टीमने कसा केला विजयाचा जल्लोष