आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या मॅचनंतर बदलले धोनीचे नशिब, सा-या देशात लागले होते \'जिंदाबाद\'चे नारे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धोनीकडे कर्णधारपदाची प्रथमच जबाबदारी दिली होती. त्याने नवोदित संघासमवेत भारताला विजेतेपद मिळवून दिले. या मॅचनंतर धोनीचे नशिब बदलले. - Divya Marathi
धोनीकडे कर्णधारपदाची प्रथमच जबाबदारी दिली होती. त्याने नवोदित संघासमवेत भारताला विजेतेपद मिळवून दिले. या मॅचनंतर धोनीचे नशिब बदलले.
स्पोर्ट्स डेस्क- 24 सप्टेंबर 2007 रोजी टी- 20 वर्ल्डकप फायनलमध्ये भारताने आपल्या सर्वात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 5 धावांनी हारवत विजेतेपद पटकावले होते. भारताने हा पहिलाच टी-20 वर्ल्डकप जिंकला होता. या विजयानंतर संपूर्ण देशाने जल्लोष केला होता. यावेळी टीम इंडियासोबतच माहीचे सुद्धा जिंदाबादचे नारे लागले होते. अशी रोमांचक होती ती मॅच, की धोनीचे नशीबच बदलले...
- अंतिम लढतीत भारताने प्रथम बॅटिंग करत 20 षटकात 5 बाद 157 धावा केल्या होत्या.
- यात सर्वाधिक धावा गौतम गंभीर (75) ने बनवल्या होत्या. त्याने 54 बॉलमध्ये 8 चौकार आणि 2 षटकार ठोकले होते.
- पाकिस्तानकडून उमर गुलने 3 आणि मोहम्मद आसिफ व सोहेल तन्वीरने 1-1 विकेट घेतली होती.
- पाकिस्तानला जिंकण्यासाठी 7.79 च्या रनरेटने 158 धावा करायच्या होत्या.
- कर्णधार धोनीने माईंड गेम खेळत बॉलर्सचा असा वापर केला की पाकिस्तान 152 धावाच करू शकला.
- भारतकडून आर पी सिंग आणि इरफान पठानने 3-3, जोगिंदर शर्माने 2 तर श्रीशांतने 1 विकेट घेतली.
- या मॅचने सिद्ध केले होते की, धोनी टेस्ट, वनडे आणि टी-20 मध्ये संघाला यश देऊन देण्याची क्षमता ठेवतो.
- या मॅचचा उल्लेख त्याची बायोपिक "एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी" मध्ये करण्यात आला आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, पाकिस्तानविरूद्धच्या विजयानंतर टीम इंडियाने कसा केला होता जल्लोष...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...