आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा लालू क्रिकेटच्या मैदानावर उतरतात, 50 बॉल 80 रन, 42 नो बॉल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा (बिहार)- 2006 मध्ये झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत लालू प्रसाद यादव यांना नितीशकुमार यांनी धुळ चारली होती. त्याच वर्षी 28 जानेवारी रोजी लालू प्रसाद यादव क्रिकेटच्या मैदानावर उतरले होते. त्यावेळी ते केंद्रीय रेल्वेमंत्री होते. यावेळी रेल्वे इलेव्हन आणि पत्रकार इलेव्हन या संघांमध्ये पाटण्याच्या मोईनुल स्टेडियममध्ये मॅच झाली होती. रेल्वेच्या संघाकडून लालू मैदानात उतरले होते. त्यावेळी नितीशकुमार नावाच्या एका पत्रकाराने त्यांना क्लिनबोल्ड केले होते. त्यानंतर बिहारच्या वृत्तपत्रांमध्ये बातमी आली होती, की नितीशकुमार यांनी लालू यांना क्लिनबोल्ड केले. या सामन्यात लालूंनी 20 धावा काढल्या होत्या. त्यांनी बॉलिंग केली तेव्हा एक ओव्हर 50 बॉलचा झाला. या ओव्हरमध्ये त्यांनी 80 रन दिले. त्यात त्यांनी तब्बल 42 नो बॉल टाकले होते.
या सामन्याचे फोटो बघण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा....
बातम्या आणखी आहेत...