आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...जेव्हा शांत स्वभावाचा राहुल द्रविड गौतम गंभीरवर भडकतो, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गौतम गंभीर आणि राहुल द्रविड यांच्यातील बाचाबाची सोडवायला पंचाला मध्यस्थी करावी लागली होती. - Divya Marathi
गौतम गंभीर आणि राहुल द्रविड यांच्यातील बाचाबाची सोडवायला पंचाला मध्यस्थी करावी लागली होती.
स्पोर्ट्स डेस्क- मिस्टर कूल, मिस्टर डिपेंडेबल आणि द वॉल आदी नावाने क्रिकेट रसिकांत प्रसिद्ध असलेला टीम इंडियाचा माजी क्रिकेटर राहुल द्रविड आज आपला 44 वा बर्थडे साजरा करत आहे. कर्नाटकच्या या स्टार क्रिकेटरला राग तसा येतच नाही पण आयपीएल-6 दरम्यान एकदा तो गौतम गंभीरवर जाम भडकला होता. कायम शांत आणि संयमी स्वभावाच्या द्रविडला राग आल्याचे पाहून सर्वांना धक्का बसला. राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईटरायडर्स यांच्यात झालेल्या त्या सामन्यात राजस्थानचा कर्णधार असलेल्या राहुल द्रविडसोबत गंभीर आणि बिसलाने विनाकारण वाद घातला. वॉटसनमुळे पेटला होता वाद...
 
- हा वाद तेव्हा सुरु झाला जेव्हा राजस्थान रॉयल्सच्या शेन वॉटनसनने केकेआरचा फलंदाज बिसलाला बॉल टाकल्यानंतर कटाक्ष टाकणे सुरु केले. 
- यानंतर द्रविड दोघांना दूर करायला पीचवर पोहचला तेव्हा दुस-या बाजूने गंभीरने वादात तोंड घातले. 
- मी शाब्दिक वाद मिटवत असताना तू कशाला मधे बोलतोय असे द्रविडने गंभीरला सांगायचा प्रयत्न केला. उलट गंभीरचा आवाज वाढला.
- यामुळे राहुल द्रविड प्रथमच गौतम गंभीरवर जाम भडकला. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, कशा पद्धतीने एकमेंकाना भिडले होते हे खेळाडू....