आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • When Sachin's Passion For Driving And Speed Became Headache For Wife Anjali

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सचिनच्या ड्रायव्हिंगच्या छंदाने जेव्हा अंजलीचे उठले होते डोके

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे कार प्रेम जगजाहीर आहे. मात्र, त्याचा हाच छंद एकदा त्याच्या पत्नीसाठी डोकेदुखी ठरला होता. काही वर्षांपूर्वी सचिनने इंग्लंडमध्ये बीएमडब्ल्यू कारची टेस्ट ड्राइव्ह केली होती. तेव्हा त्याने सुसाट वेगाने कार पळवली आणि त्यामुळे अंजलीचे अक्षरशः डोके दुखायला लागले होते. त्या दिवशी दिवसभर तिचे डोके ठणठणत होते. याचा खुलासा स्वतः सचिनने नुकताच एका गेम लॉन्च इव्हेंटमध्ये केला आहे.
सचिनचा छंद बनला अंजलीची डोकेदुखी
सचिन म्हणाला, 'काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आम्ही इंग्लंडमध्ये होतो. बीएमडब्ल्यूने त्यांच्या लिमीटेड एडिशनची एक कार मला टेस्ट ड्रायव्हसाठी दिली होती. त्यावर त्यांना माझा अभिप्राय हवा होता. विशेषतः ब्रेक बद्दलचा. या ड्राइव्हवर निघाल्यानंतर मी अंजलीला सोबत घेतले आणि कारचा वेग वाढवला. तेव्हा मी किती स्पिडने कार चालवत होतो हे आत्ता आठवत नाही. कारण त्यांनी मला ब्रेक चेक करण्यास सांगितले होते, त्यामुळे मी पूर्ण वेगात कार चालवत होतो. तो रोमांचक अनुभव होता. अंजली आणि मी आम्ही दोघांनी तो अनुभव घेतला. त्यानंतर दिवसभर आमच्या दोघांचे डोके दुखत होते. ती आठवण आजही ताजी आहे.'
कार आणि वेगाचे वेड सचिनला लहानपणापासून आहे. त्याने त्याच्या एका मित्रासह मुंबईतील गो-कार्टिंग रेस ट्रॅक देखील रि-डिझाइन केला आहे.

पुढील स्लाइडमध्ये, फेरारी पासून मर्सिडिजचा मालक
बातम्या आणखी आहेत...