आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 वर्षे मोठी व 2 मुलांच्या आईच्या प्रेमात पडला होता शिखर धवन, वाचा LOVE STORY

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिखर धवन आणि आयशा मुखर्जी... - Divya Marathi
शिखर धवन आणि आयशा मुखर्जी...
स्पोर्ट्स डेस्क- श्रीलंकेविरूद्धच्या कसोटी मालिकेत जबरदस्त शतके ठोकून सर्वांचे लक्ष वेधून टीम इंडियाचा गब्बर सध्या चर्चेत आहे. क्रिकेट करियरसारखेच शिखर धवनची पर्सनल लाईफ सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. 8 वर्षापूर्वी धवन 10 वर्षांनी मोठी आणि  2 मुलांची आई असलेल्या आयशा मुखर्जीच्या प्रेमात पडला होता. अखेर धवनने तिच्याशी डेटिंगनंतर 3 वर्षांनी लग्न केलेच. फेसबुकवरचा फोटो पाहून झाला होता क्रेजी...

- एकदा शिखर धवन आणि हरभजन सिंग फेसबुकवर टाईमपास करत होते. त्यावेळी भज्जीने आपल्या फ्रेंडबाबत धवनला सांगितले. 
- 25 वर्षाचा धवन आयशाचा फोटो पाहून क्रेजी झाला. तसेच तिला भेटण्याची व्यक्त केली. यासाठी भज्जीने त्याला फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यास सांगितले.
- धवनने आयशाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवताच तिने काही मिनिटांतच स्वीकारली.
- दोघे फ्रेंड झाल्यानंतर त्यांच्यात सामान्य चॅट होऊ लागले. त्यामुळे भज्जीप्रमाणेच तो आयशाचा चांगला मित्र बनला.
- शिखर धवन तर आयशाच्या प्रेमात होताच. मात्र तिने आपण तुझ्यापेक्षा वयाने 10 वर्षे मोठे व 2 मुलांची आई असल्याचे सांगितले. मात्र धवनला याने काहीच फरक पडणार नव्हता.
- आयशाचा जन्म ऑस्ट्रेलियात झाला तिचे वडिल बंगाली होते तर आई इंग्लिंश होती. ती प्रोफेशनल बॉक्सर राहिली आहे.
 
आयशाने केले लग्नासाठी प्रपोज-
 
- शिखर व आयशा एकमेंकांच्या प्रेमात होते. मात्र, धवनला क्रिकेटमध्ये करियर करायचे होते. त्यामुळे त्याला त्याच्यावर फोकस करायचे होते.
- मात्र, आयशाने धवनला तुला हवा तेवढा वेळ घे. करियरवर लक्ष केंद्रित कर असा सल्ला दिला.
- अखेर धवन व आयशाने 2009 मध्ये साखरपुडा केला. दोघांनी तीन वर्षे डेटिंग केले.
- यानंतर 30 ऑक्टोबर 2012 रोजी दोघे विवाहबंधनात अडकले.
- आयशाचे पहिले लग्न एका बिझनेसमॅनसोबत झाले होते. आयशाला पहिल्या पतीपासून दोन मुली आहेत. रिया आणि अलियाह.
- शिखरला आयशापासून एक मुलगा झाला ज्याचे नाव या कपलने जोरावर ठेवले आहे.
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, धवन-आयशाचे फोटोज आणि काही FACTS....
 
बातम्या आणखी आहेत...