आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

T20 विश्वचशकासाठी भारताचे नेत्रृत्व कुणी करावे, 70% लोक म्हणतात धोनी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने आफ्रिकेला कसोटी मालिकेत 3-0 ने पराभूत केले. त्यामुले आता क्रिकेटच्या वर्तूळात विराटलाच टी-20 विश्वचशकासाठी कर्णधार करावे अशी जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, या पारश्वभूमीवर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात 70% चाहते महेंद्रसिंह धोनीलाच पसंत करत आहेत

सर्वेक्षणात विराट पिछाडीवर, धोनी अव्वल
करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात, एखादी मालिका जिंकली म्हणून विराटला कर्णधारपद देणे कितपत योग्य आहे, या प्रश्वनावर आम्ही सर्वेक्षण केले. त्यात 30 टक्के चाहत्यांनी विराटला पसंती दिली तर 70 टक्के चाहते म्हणताता की, महेंद्रसिंह धोनीच यासाठी योग्य आहे.
सर्वेक्षणात आलेली प्रतिक्रिया
सनी नावाच्या एका क्रिकेट प्रेमीने लिहिले आहे की, "धोनी परफेक्ट कैप्टन हैं। विराट दूध पीता बच्चा है। विश्वचषक-2015 च्या उपात्यसामन्यात भारताचा त्याच्यामुळेच पराभव झाला होता. त्याची केवळ धोनीला कर्णधार पदावरून काढाण्याचीच इच्छा आहे."
धोनीचे नेतृत्व
- टी-20 आणि एकदिवसीयमधील सर्वात यशस्वी कर्णधार, ICC चे सर्वच्या सर्व चशक जिंकण्याचा विक्रम.
- 186 एकदिवसीय सामने : या पैकी, 107 सामन्यात विजय, 67 मध्ये पराभव, 1 बरोबरीत, तर 3 अनिर्णित, विजयाची सरासरी 61 टक्के.
- 51 T-20 सामने : 26 विजय, 23 पराभव, 1 बरोबरीत, 1 अनिर्णित, विजयाची सरासरी 53.00 टक्के.
- विराटचे नेतृत्व
विराट कोहलीच्या नेत्रृत्वात भारताला 10 कसोटीत 5 विजयी, 2 सामन्यात पराभव 3 सामने अनिर्णित. आता कोहलीला आपल्या नेत्रत्वाचा चमत्कार दाखवण्यासाठी किमान 10 महिन्याची वाट पाहावी लागणार आहे. कारण पुढील वर्षातील सप्टेंबरपर्यंत भारताचा कसोटी खेळण्याचा कोणताही कार्यक्रम नाही.

केव्हा आहे टी-20 विश्वचशक
- टी-20 विश्वचशक 2016 मध्ये 11 मार्चपासून 3 एप्रिल पर्यंत भारतातच खेळवला जाणार आहे.
- सामने बेंगळुरु, चेन्नई, धर्मशाला, मोहाली, मुंबई, नागपुर, दिल्ली आणि कोलकाता येथे खेळवले जातील.
- या आधी भारत-ऑस्ट्रेलियायदम्यान एकदिवसिय आणि टी20 मालिका होणार आहे.
- विश्वचशकाच्या आधी बांगलादेशमध्ये टी-20 आशिया चशक (भारत, श्रीलंका, पाकिस्तान, बांग्लादेश आणि फगानिस्तान) खेळला जाणार आहे.
बातम्या आणखी आहेत...