आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅशेस: टूर संपण्याआधीच पत्नी अन् मुलीबरोबर घरी परतला \'रागावलेला\' हॅडिन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नी कॅरीनासह ब्रॅड हॅडिन (फाइल फोटो). - Divya Marathi
पत्नी कॅरीनासह ब्रॅड हॅडिन (फाइल फोटो).
लंडन- वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियन टीमच्या अडचणी संपता संपेना. आधी 3-1 ने सिरीज गमावली, नंतर पत्नींमधील भांडणे आणि टीममध्ये फूटीची बातमी. ही बातमी जुनी होत नाही तोच, आता टीमचा विकेटकिपर बॅट्समॅन ब्रॅड हॅडिन टूर संपण्याआधीच घरी परतला आहे. त्याच्या बरोबर पत्नी कॅरिना आणि मुलेही आहेत. अद्याप अॅशेस सीरीजचा अंतिम सामना शिल्लक आहे. तो ओव्हलमध्ये 20 ते 24 अॉगस्ट दरम्यान खेळला जाईल.
का आला हॅडिनला रागः
हॅडिन टूरच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये खेळला होता. दुसऱ्या मॅचमध्ये, तो मुलगी आजारी असल्याने खेळूशकला नाही. या नंतर तिसऱ्या आणि चौथ्या मॅचसाठी त्याची संघात निवड करण्यात आली नाही. या गोष्टीला काही माजी खेडूंनी विरोधही केला होता. ब्रॅड हॅडिनही टीममध्ये निवड न झाल्याने रागातच होता. यामुळेच त्याने टूर आर्ध्यावर सोडून घरी परतण्याचा निर्णय घेतला.
... हॅडिन सन्यास घेणार का?
रिकी पाँटिंगने टीमच्या खराब प्रदर्शनासंदर्भात नुकतीच एक कमेंट केली होती. तो म्हणाला होता, सध्याच्या संघातील अर्धे खेळाडू पुढील टूर वर जाणार नाही. पाँटिंगचे असे म्हणणे, हॅडिनकडे तर इशारा नव्हता? हॅडिनची संघात निवड करण्यात आली नाही म्हणून तो निवृत्त होण्याचाही विचीर करत असण्याती शक्यता नाकरता येत नाही. त्याला इंग्लंड विरूद्ध होणाऱ्या वनडे आणि टी-20 सीरीजसाठीही संघात स्थान देण्यात आलेले नाही. ऑस्ट्रेलियन टीम 27 अॉगस्टला आयर्लंड विरूद्ध एक वनडे मॅच खेळणार असून, या नंतर इंग्लंडबरोबर एक टी-20 आणि पाच वनडे मॅचची सिरीजही खेळणार आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, ब्रॅड हॅडिन आणि त्याची पत्नी कॅरीनाचे काही निवडक फोटोज...