आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यष्टिरक्षक पार्थिव पटेलला भारतीय संघात कायम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : इंग्लंडविरुद्ध येत्या ८ डिसेंबरपासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या मालिकेतील चौथ्या कसोटीसाठी यष्टिरक्षक पार्थिव पटेलला भारतीय संघात कायम ठेवण्यात आले आहे. वेगवान गोलंदाज ईशांत शर्माला त्याच्या लग्न सोहळ्यासाठी संघातून रिलीज करण्यात आले आहे.
वृद्धिमान साहा अद्याप दुखापतीतून सावरला नसून त्याच्या जागी मुंबईतही पार्थिव पटेल खेळेल. भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या पार्थिव पटेलने मोहाली कसोटीत पहिल्या डावात ४२ आणि दुसऱ्या डावात नाबाद ६७ धावा ठोकून शानदार प्रदर्शन केले होते.
भारतीय संघ असा : विराट कोहली (कर्णधार), पार्थिव पटेल, मुरली विजय, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, के. एल. राहुल, करुण नायर, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, जयंत यादव, अमित मिश्रा, मो. शमी, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार.
बातम्या आणखी आहेत...