आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेरेनाचा साडिकाेविकवर शानदार विजय, फेडररची विजयी सलामी; माेफिल्स बाहेर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- जगातील नंबर वन सेरेना विल्यम्स अाणि सात वेळचा चॅम्पियन राॅजर फेडररने मंगळवारी सत्रातील तिसऱ्या ग्रँडस्लॅम विम्बल्डन टेनिस स्पर्धेत शानदार विजयी सलामी दिली. यासह अव्वल मानांकित सेरेनाने करिअरमधील २२ व्या ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या अापल्या माेहिमेला दमदार सुरुवात केली. तिने महिला एकेरीच्या सलामी सामन्यात स्विसच्या बिगरमानांकित साडिकाेविकचा पराभव केला. अव्वल मानांकित सेरेनाने ६-२, ६-४ अशा फरकाने सामना जिंकला. तिने अवघ्या ७३ मिनिटांत दुसऱ्या फेरीतील अापला प्रवेश निश्चित केला. अाता तिचा दुसऱ्या फेरीतील सामना अापल्याच देशाच्या क्रिस्टिना मॅक्हेलशी हाेईल. क्रिस्टिनाने पहिल्या फेरीत स्लाेव्हाकियाच्या डॅनियला हंतुकाेवावर मात केली. तिने ७-५, ६-२ ने विजय संपादन केला. त्यामुळे तिला दुसऱ्या फेरीत धडक मारता अाली.
पुरुष गटात १७ व्या मानांकित गाएल माेफिल्स अाणि पाब्लाे क्युवासला सलामी सामन्यात पराभवाला सामाेरे जावे लागले. फ्रान्सच्या जेर्मी चार्डीने अापल्याच देशाच्या माेफिल्सला बाहेरचा रस्ता दाखवला. त्याने ७-६, ०-६, ६-४ ने सामना जिंकला. यासह त्याने दुसरी फेरी गाठली. तसेच रशियाच्या अांद्रेई कुज्नेत्साेवाने २९ व्या मानांकित पाब्लाेवर मात केली. त्याने ६-३, ३-६, ५-७, ६-३, ६-४ ने राेमहर्षक विजय मिळवला.

फेडररचीपेलावर मात : १७वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन राॅजर फेडररने पुरुष एकेरीच्या सलामी सामन्यात राेमहर्षक विजय मिळवला. त्याने सलामीला अर्जेंटिनाच्या गुइडाे पेलावर मात केली. त्याने ७-६, ७-६, ६-३ अशा फरकाने सामना जिंकला. गुडघ्याच्या गंभीर दुखापतीतून सावरलेल्या फेडररला पहिल्या दाेन्ही सेटवर शर्थीची झुंज द्यावी लागली. मात्र, त्याने अनुभवाच्या बळावर सहज तिसरा सेट जिंकून सामना अापल्या नावे केला.

केर्बर, कॅराेलिना दुसऱ्या फेरीत
जर्मनीच्याएंजेलिक केर्बर चेक गणराज्याच्या कॅराेलिनाने दुसऱ्या फेरीत धडक मारली. चाैथ्या मानांकित केर्बरने सलामीला इंग्लंडच्या लाॅरा राॅबसनला पराभूत केले. तिने ६-२, ६-२ ने सामना जिंकला. तसेच कॅराेलिनाने पहिल्या फेरीत बेल्जियमच्या यानिना विकमेयरला ६-२, ०-६, ८-६ ने हरवले. सिमाेना हालेपने सलामीला स्लाेव्हाकियाच्या अॅना कॅराेलिनावर ६-४, ६-१ ने मात केली.
पुढील स्लाइड्सवर पाहा, सेरेनाने कसा केला जल्लोश... खास Photos...
बातम्या आणखी आहेत...