आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेलर, लॅथमच्या शतकाने न्यूझीलंड विजयी;३३ धावांनी जिंकला सामना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सॅटनर (३/४४) अाणि मुन्राे (२/२५) यांच्या धारदार गाेलंदाजीच्या  बळावर न्यूझीलंडने दुसऱ्या सराव सामन्यात यजमान बाेर्ड अध्यक्षीय एकादश टीमचा पराभव केला. न्यूझीलंडने गुरुवारी ३३ धावांनी विजयश्री खेचून अाणली. यासह पाहुण्या न्यूझीलंड टीमने दमदार पुनरागमन केले. या टीमला पहिल्या सराव सामन्यात पराभवाला सामाेरे जावे लागले हाेते.  

टेलर (१०२) अाणि लॅथम (१०८) यांच्या झंझावाती फलंदाजीच्या न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना युवा टीमसमाेर ३४४ धावांचेे लक्ष्य ठेवले हाेते. प्रत्युत्तरात बाेर्ड अध्यक्षीय एकादशने ४७.१ षटकांत अवघ्या ३१० धावांमध्ये गाशा गुंडाळला. अध्यक्षीय एकादश टीमकडून करून नायर (५३) अाणि गुरकिरत सिंगने (६५) तुफानी खेळी करताना अर्धशतक ठाेकल धावांचा पाठलाग करणाऱ्या अध्यक्षीय एकादशला १७ वर्षीय पृथ्वी शाॅ (२२) अाणि नायर (५ ३) यांनी दमदार सुरुवात करून दिली. त्यांनी संघाला अर्धशतकी भागीदारीची सलामी दिली. दरम्यान, सॅटनरने पृथ्वीला बाद केले.

करून नायर, गुरकिरत सिंगची अर्धशतके 
भारताकडून करून नायर व गुरकिरत सिंगने अर्धशतकी खेळी केली. नायरने ५४ चेंडूंत ७ चाैकारांसह ५३ धावांची खेळी केली. गुरकिरतने ४६ चेंडूंत ६५ धावा काढल्या. यात ७ चाैकार अाणि ३ षटकारांचा समावेश अाहे.   

रविवारपासून अाता वनडे मालिका 
येत्या रविवारपासून भारत अाणि न्यूझीलंड यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात हाेणार अाहे. यातील सलामीचा वनडे सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हाेईल.
बातम्या आणखी आहेत...