माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या निधनानंतर क्रिकेट विश्वातूनही त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांच्यासह इतर खेळाडूंनीही ट्विटरच्या माध्यमातून डॉ. कलाम यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
मास्टर ब्लास्टर सचिनने लिहीले, " माजी राष्ट्रपती, वैज्ञानिक आणि सर्वांना प्रिय असे डॉ. कलाम यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या रूपात देशाने महान माणुस पाहिला आहे." मिसाइल मॅन नावाने प्रसिद्ध असलेल्या डॉ. कलाम यांच्या विषयी विराट कोहलीने लिहीले, "ते सर्वांसाठी रोल मॉडेल आणि लिडर होते. त्यांना श्रद्धांजली."
शेवटचा प्रसंग
सोमवारी सायंकाळी माजी राष्ट्रपती डॉ. कलाम हे शिलांगमधील एका महाविद्यालयात व्याख्यान देत होते. 'पृथ्वीवरील जिवनासाठी तिला आणखी कसे सुंदर बनवता येईल.' या विषयावर ते बोलत होते. त्यांनी व्याख्यानाला सुरूवात केली. तेव्हा त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना रूग्नालयातही हलवण्यात आले. मात्र, सायंकाळी 7.45 वाजता त्यांचे निधन झाले.
पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा, क्रिकेटपटूंनी डॉ. कलाम यांना वाहिलेली श्रद्धांजली..